कमी खर्चात साकारला "स्मार्ट व्हीलेज' प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जळगाव - केंद्र शासनाच्या "स्मार्ट सिटी'च्या यशस्वी प्रयोगानंतर आता राज्य शासन देखिल "स्मार्ट व्हिलेज' हा अभिनव उपक्रम राबविण्याच्या तयारीत आहे. जळगाव शहरातील गुलाबराव देवकर अभियांत्रिकीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कमी खर्चात "स्मार्ट व्हिलेज'चा प्रकल्प तयार केला आहे. 

या स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात स्मार्ट रस्ते, स्मार्ट कचरापेटी, स्मार्ट इरिगेशन प्रणाली, स्मार्ट गटारी, स्मार्ट पथदिवे यांसह इतर बाबीचा समावेश आहे. हा सर्व प्रकल्प सौर ऊर्जेचा वापर करून तयार करण्यात आला आहे. कमी खर्चासाठी आपण हा प्रकल्प नेट मिटरिंग पद्धतीने देखील राबवू शकतो. या सर्व प्रकल्पात सेंसर पद्धतीच्या वापर केला जातो. हा प्रकल्प मनीष पाटील, रवी यादव, जयश्री सुतार, ऋतुजा भावसार या चार विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. त्यांना प्रा. बी. एस. सोनवणे, विभागप्रमुख प्रा. आर. आर. करे, प्राचार्य ए. जे. पाटील, उपप्राचार्य सी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

"स्मार्ट व्हिलेज' प्रकल्पाचे फायदे 
या प्रकल्पात स्मार्ट कचरापेटीत सेन्सरमुळे ती कचरापेटी भरली किंवा नाही या बाबत ग्रामपंचायतीच्या कंट्रोल रूमला सूचित करते. स्मार्ट इरिगेशन प्रणालीत देखिल सेंसरचा वापर केला आहे. यात झाडा जवळील माती जेव्हा कोरडी राहील तेव्हा पाण्याची मोटर आपोआप सुरू होईल. तसेच ठराविक खोलीपर्यंत जमिनीत पाण्याचा ओलावा गेला की पाण्याची मोटर आपोआप बंद होईल. स्मार्ट पथ दिव्यासाठी देखिल सौर ऊर्जेचा वापर केला आहे. यात सर्व पथदिवे रात्री आपोआप सुरू होतील अन सकाळी आपोआप बंद होतील. तसेच स्मार्ट जल प्रवाह यंत्रात देखील सेन्सर पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे गावातील एखाद्या नळाचे पाणी वाया जात असल्यास तो नळ ग्रामपंचायतीचा कंट्रोल रूम मधून बंद करता येईल.