मनमाडमध्ये वर्चस्वाच्या वादातून एकाचा खून

मनमाडमध्ये वर्चस्वाच्या वादातून एकाचा खून

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकावरील अनधिकृत व्यवसायाच्या वर्चस्ववादाचा शहरात सुरु असलेल्या कुरबुरीतून मंगळवारी रात्री टोळीयुद्धाचा भडका उडाला रॉड, चॉपर, नंग्या तलवारी परजत दोन गटात  झालेल्या जीवघेण्या हाणामारीत पापा शेख याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बाहेर गावाहून गुंडांची टोळी बोलावून हल्ला केला गेला. जमधाडे चौक भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा पोलिस प्रशासन तळ ठोकून आहे.

मनमाड शांतताप्रिय शहर असून, रेल्वे स्थानकावर चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायाने या शांततेचा भंग केला. या अनधिकृत व्यवसायाच्या वर्चस्ववादाची कुरबूर नेहमी टोळी युद्धातून होते. सतत तुंबळ हाणामारी होऊन मध्यस्तीच्या पुढारपणामुळे केवळ किरकोळ गुन्हा नोंद करून परस्पर प्रकरण मिटवले जायचे. विशेष म्हणजे या टोळी युद्धाची दहशत शहरात निर्माण झालेली होती. कोणीही त्याबद्दल बोलायला तयार नव्हते. राजकारण्यांनीही मौन पाळले होते. पोलिसांनीही अनेकदा टोळीयुद्ध करणारे आरोपी रेकॉर्डवर घेण्याऐवजी मिटवामिटवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धुसफूसचे पर्यावसन आज टोळीयुध्दाच्या मोठ्या हाणामारीत झाले.

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटाचे २० ते २५  तरुण तोंडाला रुमाल बांधून जिप्सी गाडी, एक मोठी गाडी, मोटार सायकल वरून हातात रॉड, चॉपर, धारदार  शस्रे, नंग्या तलवारी घेऊन जमधाडे चौकाच्या रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भागात घुसून हाणामारी करू लागले. दुसऱ्या गटाने प्रत्युत्तर देत हाणामारी सुरू केली. दोन गटात टोळीयुद्ध सुरू झाले. रस्त्यात जे वाहन दिसेल. त्याची तोडफोड केली गेली. घरासमोर उभ्या असलेले तरुण, महिला यांना मारहाण केली आणि याच हाणामारीत समीर उर्फ पापा शेख याला चॉपरने घाव केल्याने गंभीर जखमी झाला. त्याला मनमाड उपजिल्हा रुग्णालयातून नाशिक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. अगदी सिनेस्टाइल हल्ला चढवित दहशत निर्माण केली. 

हल्लेखोर फसार झाले विशेष म्हणजे हे हल्लेखोर गुंडांची टोळी मुंबई व इतर ठिकाणाहून आणली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल, सहाय्यक पोलिस अधीक्षक रागसुधा आर, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. जिल्हा पोलिस प्रशासन शहरात तळ ठोकून आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून या बाहेरच्या टोळीतील १६ जणांना शिताफीने चांदवड येथे ताब्यात घेतले. तर इतर दोन जणांनाही ताब्यात घेतले.

◆ टोळीयुद्धाचे मूळ कारण रेल्वे स्थानक ◆

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात मनमाड स्थानक जंक्शन आहे. येथे मोठ्या प्रमाणात गाड्या व हजारो प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे या स्थानकावर चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. खाद्यपदार्थ, पेयजल, अनधिकृत वेंडर याचे मोठे प्रस्थ चालवणाऱ्या टोळ्या येथे आहे या अनधिकृत व्यवसायाच्या वर्चस्ववादाच्या नेहमी कुरबुरी, हाणामारी होतात याच हाणामारीचे पर्यावसान टोळीयुध्दात झाले. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर हे प्रस्थ वाढू लागले. जुजबी कारवाईशिवाय काहीही केले गेले नाही, याच रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कुरबुरी शहरात टोळीयुध्दात होऊन दहशत निर्माण केली जाते. आज दिलेल्या फिर्यादीत याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. तसेच पोलिस प्रशासनानेही हे कबूल केले. 

◆ पोलिसही संशयाच्या भोवऱ्यात ◆

गेल्या काही महिन्यांपासून शहरात या टोळीयुद्धाचा भडका उडून शहरात दहशत निर्माण केली जात होती. हातात रॉड, तलवारी घेऊन हाणामाऱ्या केल्या गेल्या. मात्र, पोलिसांनी ठोस भूमिका घेतली नाही. दहशत माजवणारे आरोपी रेकॉर्डवर घेतले गेले नाही. काही कारवाया सोडल्या तर अनेकदा किरकोळ गुन्हा दाखल करून समजावण्याचा प्रयत्न केला. काहींनी मध्यस्थी करून काहीच झाले नाही असा देखावा केला. मात्र या मध्यस्तीचा काहीच उपयोग झाला नाही व्हायचे तेच झाले. यातूनच या टोळक्यांचे मनोबल वाढले आणि हाणामारीचे पर्यावसन टोळीयुध्दात भडका होऊ लागला.

शहरातील ५२ नंबर, जमधाडे चौक भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले पापा शेख याचे प्रेत धुळे येथून शवविच्छेदन करून आणल्यावर थेट पोलीस स्थानकात आणण्यात आले. नातेवाईकांनी प्रेत घेतले नाही. पोलिसांनी वेळीच गुन्हे दाखल केला असता तर आज आमचा माणूस गेला नसता, चार दिवसांपासून हाच पापा शेख गुन्हा दाखल करायला आला होता. मात्र गुन्हा दाखल केला गेला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलिसांनी सर्व आरोपींना पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी प्रेत घरी नेले 

◆ दाखल गुन्हे◆

नुसरत समीर शेख या मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून इलियास इस्माईल सय्यद, इस्माईल सय्यद, हबीब हातम शेख, इरफान इस्माईल सय्यद, इम्रान सय्यद, वसीम बंबईवाला, राजू निसार सय्यद, अज्जू निसार सय्यद, समीर खलील सय्यद, जमीर खलील सय्यद, खलील मुसा सय्यद, अमजद खान करिम खान, इकबाल टायरवाला, जाफर मुसा सय्यद, सलीम मुसा सय्यद, इम्रान खान करीम खान, सोयब हबीब शेख, भय्या सलिम सय्यद, नदीम शेट व इतर पंधरा जणांवर हाणामारी, खून, तोडफोड, जीवे मारणे, एकत्रित हल्ला चढवणे आदी गुन्हे दाखल केले आहे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com