नाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 

नाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 

नाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धा बुधवार (ता. 8)पासून रविवार (ता. 12)पर्यंत नाशिक जिमखाना येथील क्रीडासंकुलात होणार आहेत. ही माहिती संघटनेचे व संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
श्री. छाजेड म्हणाले, की पाच दिवस होणाऱ्या या स्पर्धा आठ टेबलांवर होतील. स्पर्धेत 710 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा पुरुष, महिला, मुले व मुली अशा बारा वेगवेगळ्या गटांत होणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेतर्फे प्रमुख पंच म्हणून रोहित शिंदे (ठाणे), उपपंच प्रमुख विलास बावकर (पुणे) यांची नियुक्‍ती केली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन बुधवारी (ता. 8) सकाळी साडेदहाला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या उपस्थितीत होईल. तसेच अर्जुन पुरस्कारविजेता टेबल टेनिसपटू कमलेश मेहता याची प्रमुख उपस्थिती असेल. भाजपचे सुहास फरांदे, महेश हिरे, राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस उपस्थित राहणार आहेत... 

असे आहेत गट : महिला व पुरुषांचे खुले गट असतील. याशिवाय मुला-मुलींमध्ये मिडजेट, कॅडेट, सबज्युनिअर, ज्युनिअर, यूथ या गटांत स्पर्धा होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com