महासभेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी धुडकावले-मुंढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नाशिक :  अंदाजपत्रकीय महासभेत नगरसेवकांनी सुचविलेली विकास कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळून लावतं प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचीचं अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांवर आरोप करतांना पुरावे द्या लगेचचं कारवाई करतो,पण बिनबुडाचे आरोप केल्यास खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम त्यांनी नगरसेवकांना भरला. त्यामुळे नगरसेवक विरुध्द आयुक्त संघर्ष पेटला आहे.

नाशिक :  अंदाजपत्रकीय महासभेत नगरसेवकांनी सुचविलेली विकास कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळून लावतं प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचीचं अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांवर आरोप करतांना पुरावे द्या लगेचचं कारवाई करतो,पण बिनबुडाचे आरोप केल्यास खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम त्यांनी नगरसेवकांना भरला. त्यामुळे नगरसेवक विरुध्द आयुक्त संघर्ष पेटला आहे.

प्रशासनाच्या अंदाजपत्रकात चोविस तास पाणी पुरवठ्याबरोबरचं नवीन उपक्रमांचा समावेश असून ते पुर्ण करून दाखविलचं असा निर्धार करतं पालिकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी कठोर घेणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. 

   प्रशासनाने स्थायी समितीवर 1785.15 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्याचवेळी आयुक्त मुंढे यांनी एक रुपयांचे देखील अतिरिक्त कामाचा समावेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

हक्कांवर गदा आणली जात असल्याने स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी 115 कोटी रुपयांची वाढ करतं 1900.15 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. यावेळी नगरसेवकांनी मागील वर्षातील कामांचा समावेश करण्याबरोबरचं पाणीपुरवठा, स्मशानभुमी, रस्ते विकासांची कामे सुचवली. कामे सुचविताना प्रशासकीय कामकाजावर देखील बोट ठेवले. 

   46 नगरसेवकांच्या भाषणानंतर आयुक्त मुंढे यांनी अडिच तासांच्या घणाघाती भाषणात नगरसेवकांचे मुद्दे खोडून काढतं प्रशासनाच्याचं अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. शहर विकासाचा अभ्यास करतांना विकास खुंटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुधारणा आवश्‍यक असल्याचा निर्धार केला. कामे करण्यासाठी उत्पन्न वाढवावे लागणार आहे. त्यासाठी कटू निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. महापौर रंजना भानसी यांनी स्थायी समितीचे अंदाजपत्रक मंजुर करतांना नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा अंतर्भाव करण्याचे आदेश दिल्याने वर्षभर विकासकामांवरून महापालिकेत संघर्ष पहायला मिळणार आहे. 

आयुक्त म्हणतात 
- बांधकाम परवानगी देण्यापुर्वी ईमारतींची पाण्याची गरज तपासणार. 
- पालिकेच्या सेवा आऊटसोर्सिंगने करणार. 
- 2019 पर्यंत शहरात चोविस तास पाणी पुरवठा करणार. 
- पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आठ दिवसात स्काडा तंत्रज्ञान. 
- नगरचना विभागात ऑटो डिसीआर नुसारचं प्रकरणांना मंजुरी. 
- टिडीआर प्रकरणे तीस दिवसात निकाली लावणार. 
- कपाटे नियमितीकरणासाठी पुढील आठवड्यात सुचना. 
- मुदतीत अनाधिकृत बांधकामे अधिकृत न केल्यास तोडणार. 
- महिना भरात शहरात 33 ठिकाणी पार्किंग सुरु होणार. 
- लाभार्थ्यांनी घरकुले न घेतल्यास झोपडपट्ट्या तोडणार. 

Web Title: marathi mahasabha balancesheet