Tryambakeshwar.
Tryambakeshwar.

नाशिकमध्ये भाजप व शिनसेनेला पालिका निवडणूकीत यश

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी पालिका निवडणूकीत अनुक्रमे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी आपले गड राखण्यात यश मिळविले आहे. त्र्यंबकेश्‍वरच्या नगरअध्यक्षपदी भाजपचे पुरूषोत्तम लोहगावकर तर इगतपुरी शिवसेनेचे संजय इंदुलकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना या निवडणूकीत भोपळा फोडता आला नाही. त्र्यंबकेश्‍वर पालिकेसाठी आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून भाजपचे पुरूषोत्तम लोहगावकर आघाडीवर होते. त्र्यंबकेश्‍वर पालिकेत भाजपला चौदा, शिवसेनेला दोन तर एक अपक्ष असे निवडून आलेल्या नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. 

इगतपुरी पालिकेत शिवसेनेचे इंदुलकर पहिल्या फेरीपासून बहुजन विकास आघाडीचे फिरोज पठाण यांच्याविरोधात आघाडी टिकवून होते. या पालिकेत शिवसेनेने 13, भाजपने 4 व एक अपक्षाने जागा जिंकली आहे. इगतपुरीत कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सत्ता परीवर्तनासाठी तयारी सुरू केली असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर गटांनी बहुजन विकास आघाडी स्थापन केली होती. यामुळे तेथे तिरंगी लढत होऊन शिवसेनेला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. त्र्यंबकेश्‍वर पालिकेत भाजप, शिवसेना व कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होती. या निवडणूकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे तीन आमदार व नाशिक महापालिकेतील वीस नगरसेवक यांनी जोर लावला होता. कॉंग्रेसतर्फेही प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तर शिवसेनेतर्फे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांच्या सभा झाल्या होत्या. इगतपुरीतही सत्ता मिळविण्यासाठी भाजपने प्रथमच स्वतंत्र निवडणूक लढवून जोर लावला होता. परंतु मतदारांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com