धुळे - आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हस्तकलेचे प्रशिक्षण

Workshop
Workshop

म्हसदी (धुळे) : 'कमी खर्चात, कमी वेळेत हस्तकलेतून अनेक स्वस्त वस्तू तयार करण्याची कला आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत दाखविण्यात आल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.'

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जव्हार येथील आदिवासी समाज विकास संस्थेतर्फे आज सकाळी येथील विद्याकल्प आदिवासी आश्रम शाळेत अनूसुचित जमातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करण्याची प्रशिक्षण कार्यशाळा झाली.

मुख्याध्यापक विजय भामरे अध्यक्षस्थानी होते. आश्रमशाळेतील 420 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षिका श्रीमती रेश्मा मोरे, अंबिका कटके व प्रदिप पाटील यांनी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले. दरम्यान, जिल्हाभरात प्रकल्प अधिकारी राजाराम हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रशिक्षणात पेपर बॅग, मेणबत्ती, परफ्युम, चाॅकलेट, पिअर्स साबण, लिक्विड सोप, अगरबत्ती, फिनाईल आदी वस्तू घरच्या घरी आणि कमी खर्चात तयार करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. यावेळी उमेश देवरे, दीपक देवरे, अविनाश मोहिते, शेखर बच्छाव, सुरेखा देसले, प्रतिभा भामरे, संजीव देसाई, नवनीत अहिरराव, सचिन नेरकर, भाईदास थोरात, महेन्द्र वेडांईत उपस्थित होते. शिक्षिका संगीता गांगुर्डे यांनी सूत्रसचंलन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com