होलसेल व्यावसायिकाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नाशिक : बोगस कंपनीचे नाव सांगून एकाने शहरातील होलसेल व्यावसायिकाची पेपर कप खरेदीत 2 लाख 62 हजारांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात आयटी ऍक्‍टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शशी हरिराम हेमनाणी (रा. वेदास स्पेस बिल्डिंग, गोविंदनगर) हे प्लास्टिक साहित्य विक्रीचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांना गेल्या 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान संशयित सागर पटेल (रा. सुरत, गुजरात) याने संपर्क साधला. श्रीराम कप कंपनीचे नाव सांगून त्याने शशी हेमनानी यांच्याशी व्यावसायिका संवाद साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना पेपर कप खरेदीची गळ घातली.

  शशी हेमनानी यांचाही संशयित सागर पटेल याच्यावर विश्‍वास बसला. त्यामुळे त्यांनी पेपर कपची ऑर्डर दिली. त्यासाठी संशयित पटेल याने कप खरेदी करण्यासाठी बॅंक खात्यावर सांगितल्याप्रमाणे शशी हेमनानी यांनी 2 लाख 62 हजार रुपयांची रक्कम भरली. ही रक्कम भरल्यावरही संशयिताने सांगितल्याप्रमाणे त्यांना पेपर कप बॉक्‍स न पाठविता रक्कम ताब्यात घेत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: marathi news fraud