शिक्षक-विद्यार्थ्याकडून विजेची बचत करणाऱ्या उपकरणाची निर्मिती

residenational photo
residenational photo


इगतपुरी शहरः शालेय शिक्षणासोबतच सदैव वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत लोककल्याणार्थ नाविन्याच्या ध्यासातून सामान्य कुटुंबातील शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांनी विजेची बचत करणारे बहुपयोगी "ऍटोमॅटिक डिव्हाइस कंट्रोलर' हे आधुनिक उपकरण बनवून सर्वांना अचंबित केले. इगतपुरी तालुक्‍यातील धामणगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विज्ञानशिक्षक व नववीत शिकणारा विद्यार्थी यांनी हे उपकरण तयार केले आहे. 

इन्स्पायर ऍवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात धामणगाव माध्यमिक विद्यालयाची राज्यस्तरावर निवड झाली. उपकरणांचे सादरीकरण सौरभ खेमनार व प्रशांत गाढवे यांनी केले. विद्यालयातील विज्ञानशिक्षक डी. एन. अहिरे, मुख्याध्यापक एस. डी. अहिरे, एन. एस. इंगळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 
निवडीबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे जनता सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे अध्यक्ष ग. पां. माने, उपाध्यक्ष शैलेश माने, संचालिका सुनंदा माने, संचालक शिवाजी माने, प्रशासनाधिकारी पी. पी. संदांशी यांनी कौतुक केले. 

...असे आहे यंत्र 
विद्युत उपकरणे गरज नसताना सुरू असतात. त्याचा अपव्यय टाळण्यासाठी विजेची बचत लक्षात घेऊन स्वयंमचलीतरीत्या हे अनोखे यंत्र चालू-बंद होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बनविलेल्या यंत्रास आय.आर. सिग्नल सिस्टीम आहे. रिले सेवन सेगमेंट डिस्प्ले, एलईडी सेन्सर, मायको कंट्रोलर, आयसी, ट्रान्स्फॉर्मर आदी साहित्यांचा उपयोग उपकरणासाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आपल्या घरात लाइट, फॅन ऍटोमॅटिक चालू होतात, तर रूम व कार्यालयांमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींची मोजणी होते. प्रणाली सहज, सुलभ व सोपी असल्याने वापर करणे व हाताळणे सोपे आहे. सर्व कामे एकत्रितरीत्या एकच उपकरण कमी वेळेत, कमी श्रमात व विनाखर्चात या यंत्राद्वारे करू शकते. यंत्राची रचना साधी-सोपी असून, आकाराने कमी आहे. सहज व सुलभरीत्या विजेची बचत करणारे यंत्र मैलाचा दगड ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com