ती योग्य वेळ' कधीच येणार नाही! : खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव : मंत्रिमंडळातून पायउतार झाल्यापासून पक्षावर नाराज एकनाथ खडसेंच्या मनातील खदखद आज पुन्हा एकदा समोर आली. खडसेंच्या मंत्रिमंडळातील वापसीच्या प्रश्‍नावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी "योग्य वेळी' ते परततील, असे उत्तर दिल्यावर खडसेंनीच "ती योग्य वेळ कधीच येणार नाही' या शब्दांत आपल्या नाराजीला वाट करुन दिली. या अनपेक्षित प्रतिक्रियेनंतर दानवेही काही बोलू शकले नाही. 

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रावसाहेब दानवे आज जळगावी आले होते. सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान खडसेंच्या मंत्रिमंडळातील वापसीबाबत त्यांना छेडले असता दानवे यांनी "खडसे आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल' असे उत्तर दिले. त्यावर "ती योग्य वेळ कधी येणार' असा प्रतिप्रश्‍न विचारण्यात आल्यावर दानवेंच्या बाजूला बसलेल्या खडसेंनीच "ती वेळ कधीच येणार नाही' असे सांगत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. खडसेंच्या या प्रतिक्रियेने दानवेही अचंबित झाले व पत्रपरिषद आटोपती घेतली. 
 
अन्याय झाला तरी पक्षातच
पत्रकार परिषदेनंतर माध्यम प्रतिनिधींनी खडसेंशी संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर माझ्या अनेक चौकशा झाल्या. अनेकवेळा मला अपमानित व्हावे लागले. कितीही अपमान, अन्याय झाला तरी मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्यामुळे आपण पक्षाचे काम करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news jalgaon khadse- danve