स्वीकृत सदस्यांसाठी मोर्चेबांधणी 

स्वीकृत सदस्यांसाठी मोर्चेबांधणी 

जळगाव ः महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची 18 सप्टेंबरला निवड प्रक्रिया झाली. आता स्थायी समिती, महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांसाठी व स्वीकृत सदस्य निवडीसाठी भाजप, शिवसेनेतील इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीला सुरवात झालेली आहे. तसेच दोन्ही पक्षांकडूनही सदस्य निवडीबाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत. 
2018 ची निवडणुकीनंतर सत्तेत स्थापन झालेल्या भाजपची ही पहिली महासभा ही ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. महासभेपूर्वी स्थायी समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, तसेच समितीमधील सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची नावे निश्‍चित करून महासभेपुढे प्रस्ताव ठेवावा लागणार आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून कोणाला कोणत्या समितीवर पाठवायचे याचे नियोजन सुरू आहे. तर इच्छुकांकडून देखील पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू आहे. 

नवरात्रींत सभापती निवड 
स्थायी समिती, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी महासभेनंतर समितीच्या सदस्यांचा प्रस्ताव महासभेत गेल्यानंतर निवड होणार आहे. परंतु पितृपक्ष लक्षात घेता नवरात्रींत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी निवड होण्याची शक्‍यता आहे. 

सदस्य निवडीसाठी तयारी 
स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजपला 12 तर शिवसेनेला 3 सदस्य व अन्य एक हे अपक्ष व एमआयएम यांनी मिळून ठरविल्यास त्यांना मिळेल. जर अपक्ष उमेदवार शिवसेनेत स्वीकृत म्हणून राहिले तर भाजपच्या 
सदस्य संख्येत एका सदस्याची वाढ होण्याची शक्‍यता आहे. महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसाठी तर स्वीकृत चार सदस्यांसाठीही दोन्ही पक्षाकडून सदस्य निवडीबाबत तयारी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com