जीर्ण झालेल्या झाडांपासून धोका; महामार्ग विभागाने दखल घ्यावी

tree
tree

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे महामार्गावर सुमारे दिडशे वर्षांपासून सावली देणारे निंबाची बरीचशी झाडे आज अखेरची घटका मोजत आहेत.रसत्याचा इतिहास सागंणार्या या झाडांनी कडक उन्हाळे अंगावर घेतले असुन, वादळ वाऱ्यासह पाऊसही झेलला आहे.ही  झाडे जीर्ण झाल्याने वाहनावर कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.त्यामुळे संबधीत विभागाने या बाबत दखल घ्यावी आशी मागणी होत आहे. 

चाळीसगाव - धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील मेहुणबारे ते चाळीसगाव या दहा किलोमीटर अंतरावर रसत्याच्या दुतर्फा ठीकठीकाणी मोठ्या प्रमाणावर विशेषत  निंबाची जीर्ण झालेली झाडे आहेत. ही झाडे जीर्ण झाल्यामुळे  केव्हाही कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे.राज्य महामार्ग विभागाने या झाडांची पावसाळा सुरू होण्यापुर्वी विल्हेवाट लावावी आशी मागणी होत आहे.

मध्यंतरी या रस्त्यावरील जीर्ण झालेल्या झाडांच्या बुंध्यांना आग लावण्याचे प्रकार घडले होते.त्यामुळे आग लावलेले झाड   दोन तीन दिवसात कोसळते व त्याची चोरटे लाकडाची विल्हेवाट लावतात.

या रसत्यावर यापूर्वी चांगल्या वृक्षांना देखील आग लावुन ती तोडण्याचे प्रकार घडले आहेत.वास्तविक नियमानुसार काही झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते.मात्र ती घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.पर्यावरनाची होणारी हानी  थाबविण्यासाठी अनधिकृरित्या झाडांची तोड करणांर्यावर कठोर कारवाई करावी व जीर्ण धोकादायक झालेली झाडे तातडीने तोडावी आशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com