विजय चौधरी आता खेळणार 'हिंद केसरी'

Vijay Choudhari
Vijay Choudhari

पिलखोड(ता. चाळीसगाव) : सायगावचा(ता. चाळीसगाव) भूमिपुत्र ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे आगामी होऊ घातलेली हिंद केसरी स्पर्धा खेळणार आहेत. हिंद केसरी खेळण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील परवानगी दिली असून त्यादृष्टीने लवकरच तालीम व सरावही सुरू करणार असल्याचे त्यांनी 'सकाळ'ला सांगितले. सायगाव येथे कुस्त्यांच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी घरी आले असता, त्यांच्याशी सोमवारी(ता. 4) 'सकाळ'च्या प्रतिनिधीने संवाद साधला.

ट्रिपल महाराष्ट्र विजय चौधरी यांची डीवायएसपी पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्याचे सध्या नाशिक येथे प्रशिक्षण सुरू आहे. दरवर्षी सायगाव येथे दत्त जयंती निमित्ताने कुस्त्या होतात. विजय चौधरी हे कुठेही असले तरी खास कुस्त्यांच्या निमित्ताने आवर्जून हजेरी लावतात. प्रशिक्षण सुरू असल्यामुळे यंदा त्यांचे कुस्त्यांना हजर राहणे शक्य नव्हते. मात्र, गावातील लोकांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून कुस्त्यांसाठी उपस्थितीची विनंती केली होती.

महाराष्ट्र केसरी खेळणार नाही...
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सोशल मीडियावर आत्तापासून कुस्ती प्रेमींमध्ये महाराष्ट्र केसरी कोण खेळेल, याबद्दल उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी हे चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणार अशी पोस्ट 'फेसबुक'वर व्हायरल झाली होती. तथापि, आपण यंदाची महाराष्ट्र केसरी खेळणार नसून, आता दुसऱ्या कुस्तीपटूला खेळण्याची संधी द्यायची आहे, असे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

तर मी खेळलो नसतो...
इंदूर येथे नुकतीच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडली. यात दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा सुशीलकुमारला उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी खेळावी लागली नाही. यात सुशीलकुमारचे तिन्ही प्रतिस्पर्ध्यांनी खेळण्यास नकार दिला. यासंदर्भात विजय चौधरी म्हणाले, की, त्यांनी जर त्यांना गुरू मानले असेल, तर ते त्यांच्या जागेवर योग्य आहेत. उद्या जर माझ्यासमोर माझे गुरू रोहित पटेल असले, तर मीही खेळणार नाही. जर मला माझ्या गुरूने खेळण्यास परवानगी दिली तर नक्की खेळेल.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या घटनेनुसार केवळ तीनदा महाराष्ट्र केसरीनंतर खेळू नये, असा कोणताही नियम नव्हता. मात्र, 'अहमदनगर महाराष्ट्र केसरी 2014' अधिवेशनामध्ये राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तीन वेळा महाराष्ट्र केसरीनंतर पैलवानाला खेळवू नये, असा ठराव करण्यात आला. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्या पैलवानाने उच्च ध्येय धरून कुस्तीत करिअर करावे. कुस्तीसाठी राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ आहे.
- पै. गणेश मानुगडे, संस्थापक, कुस्ती मल्लविद्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com