असह्य तापमानाची तीव्रता कायम; पारा 44 अंशांवर स्थिर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

जळगाव ः गेल्या पंधरवाड्यापासून असह्य होणाऱ्या तापमानाचे चटके सध्या देखील चांगलेच जाणवत आहेत. सूर्य जणू आग ओकू लागला असून, वाढत्या तापमानामुळे जळगावकरांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. शहरातील पारा आठवडाभरापासून 43- 44 अंशांवर स्थिर असून, रात्री उशिरापर्यंत असह्य होणाऱ्या झळा जाणवत आहेत. 

जळगावकरांसाठी यंदाचा उन्हाळा जरा तिव्रच राहिला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढलेली तापमानाची तीव्रता आजही तीव्रच आहे. सध्या तर "मे'हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. आठवडाभरापासून तापमानाचा पारा 44 अंशांवर कायम आहे. आजही 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पारा स्थिर असून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे उन्हाची तीव्रता असह्य होत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून, पावसाचे आगमन होवून उकाडा कधी थांबणार याची प्रतिक्षा जळगावकरांना आहे. 
 
रात्री उशिरापर्यंत झळा 
तापमान 44 अंशाच्यावर असल्याने तापमानाची तीव्रता कायम राहत आहे. तापमानाची तीव्रता वाढल्याने सकाळी दहानंतर अंगाला चटके जाणवत आहेत. यामुळे दहानंतर घराबाहेर निघण्यासही कोणी तयार नाही. यामुळे दिवसभर शहरातील मुख्य रस्तेही ओस पडलेले पाहावयास मिळत आहेत. आज रविवार असल्याने शहरातील रस्त्यांवर अधिकच शांतता पाहावयास मिळाली, ती सायंकाळी सहापर्यंत कायम होती. शिवाय दिवसभर असलेल्या उष्णतेमुळे रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.

Web Title: marathi news jalgaon temperature hitting