पोलिसांचा एवढा वचक हवा की, गुटखा विक्रीची हिंमतच होऊ नये! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जळगाव : व्यसनाधीनतेचा संबंध संस्कारांशी असला तरी, पोलिसांचा धाक आणि न्यायव्यवस्थेकडून होणारी शिक्षा आदी घटकही या समस्येशी निगडित आहेत. शाळा परिसरात प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एकाला व्यसन असणे ही गंभीर बाब आहे, त्यामुळे पोलिसांचा धाक एवढा असायला हवा की, गुटखा विक्रीची कुणाची हिंमतच होऊ नये, या शब्दांत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. भुसावळ येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्यांनी 'सकाळ'च्या बातमीचा उल्लेख करत पोलिसांना यासंबंधी कठोर कारवाईचे आदेश दिले. 

बंदी असूनही जिल्ह्यात सर्रास गुटखाविक्री होत असल्याबाबत 'सकाळ'ने आज 'थर्ड आय' या विशेष पानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विदारक स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच त्यासोबतच प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी व्यसनाधीन असल्याबाबत वृत्त दिले असून या दोन्ही वृत्तांचा उल्लेख पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमात केला.

व्यसनाधीनता संस्कारांशी संबंधित असली तरी पोलिसांचा धाक असेल तर अंमली पदार्थ बाजारपेठेत येणारच नाहीत. मात्र, पोलिसांचा धाक नसल्यानेच गुन्हेगारांचे फावते. शाळा-महाविद्यालयीन परिसरात सर्रास गुटखा, सिगारेट मिळत असेल तर ती गंभीर बाब आहे. त्यांची हिंमतच कशी होते? असा प्रश्‍न विचारुन पाटील यांनी या गंभीर विषयावर चिंता व्यक्त केली.