निजामपूर पोलीस ठाण्यात तनिष्कांतर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा

प्रा.भगवान जगदाळे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील तनिष्का गटातर्फे आज निजामपूर-जैताणे (ता.साक्री) पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित तनिष्का भगिनींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण केले व त्यांना पेढे भरवून राख्या बांधल्या.

सणासुदीला पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत नसल्याने ते आपल्या बहिणींकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे ती पोकळी भरून काढण्यासाठी तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी वाणी, तनिष्का समन्वयिका तथा जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरे, तनिष्का सदस्या मोहिनी जाधव, निकिता सोनार, गौरी कासार आदी तनिष्कांनी हा उपक्रम राबविला. यावेळी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस हवालदार आनंदा पवार, महावीर भदाणे, मयूर सूर्यवंशी, महिला पोलीस कर्मचारी ललिता पाटील, हिराबाई ठाकरे व सामाजिक कार्यकर्ते रमेश वाणी आदी उपस्थित होते. यावेळी मिठाईचे वाटपही करण्यात आले.

'महिलांची सुरक्षा ही पोलिसांसह सर्वांची सामूहिक जबाबदारी असून राखीच्या धाग्यामुळे ही सुरक्षेची जबाबदारी अजून जास्त प्रमाणात वाढली आहे. पोलीस हेच तुमचे खरे बंधू असून महिलांनी निर्भयपणे व मनमोकळेपणाने आपली समस्या पोलिसांना सांगावी...'
- दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपूर-जैताणे पोलीस स्टेशन