अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३७ वाहनांना घेतले ताब्यात

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३७ वाहनांना घेतले ताब्यात

सटाणा : लाखो रुपयांचा महसूल बुडवत नंदुरबारहून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३७ वाहनांना पकडून येथील तहसील आवारात कारवाईसाठी उभी करण्यात आली आहेत.

या कारवाईतून ३५ ते ४० लाख रुपयांचा महसूल दंड स्वरुपात प्राप्त होणार असल्याची माहिती बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांनी आज येथे दिली. दरम्यान, गौण खनिज प्रतिबंधात्मक प्रकरणी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

याबाबतचे वृत्त असे : नंदुरबार कडून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ताफा सटाण्याकडे येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महाजन यांना मिळाली होती. त्यानुसार बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी २५ कर्मचाऱ्यांसह सापळा लावून काल सायंकाळी पाच वाजेपासून ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील करंजाड शिवारात हॉटेल शाहू येथे ही वाहने ताब्यात घेतली. त्यातील पाच वाहन चालकांकडे वाळू वाहुतकीचे परमीट होते. एम.एच.१८ बी.८२९२ या वाहनाचे एक्सल तुटल्यामुळे ते जागेवरच उभे आहे. तर एम.एच.१५ डी ७२०० हे वाहन घेवून चालक पळून गेला. महसूल विभागाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी (एम.एच.१५ इ.इ. १७९८), (एम.एच.१५ एफ.व्ही.१७९८), (एम.एच.१५ एफ.क्यू.२०२५), (एम.एच.१५ इ.जी.८८००), (एम.एच.१५ इ.जी.६६६७), (एम.एच.१५ एफ.व्ही.९९८१), (एम.एच.१५ ए.जी.९८७८), (एम.एच.१७ बी.डी ७९११), (एम.एच.१५ इ.जी. १७९८), (एम.एच.१५ एफ.व्ही.४४५५), (एम.एच.१५ सी.के.८९२५), (एम.एच.१५ बी.जे.९६७९), (एम.एच.१५ ए.के.९०९५), (एम.एच.०४ सी.व्ही.९२३८), (एम.एच.१८ बी.ए.८२९२), (एम.एच.०४ डी.के.३१९२), (एम.एच.१२ जी.टी.११७०), (एम.एच.१४ ए.एस.९७८४), (एम.एच.४१ जी.७२७७), (एम.एच.१५ डी.के. ७२००), (एम.एच.१५ इ.जी.७६६६), (एम.एच.१५ बी.जे.७०५५), (एम.एच.१५ डी.के.७००९), (एम.एच.१५ वाय.७०७७), (एम.एच.१५ बी.जे.८८०८), (एम.एच.१८ ए.ए.१७०७) ही २७ वाहने ताब्यात घेतली, मात्र कारवाईच्या भीतीने या वाहनांचे चालक फरारी झाले. त्यामुळे जायखेडा पोलिसांच्या मदतीने ही वाहने तहसील कार्यलयाच्या आवारात आणण्यात आली.

ज्या पाच वाहन चालकांकडे वाळू वाहतुकीचे परमिट होते, त्या वाहनात परमिटपेक्षा अतिरिक्त वाळू आहे किंवा नाही याची पडताळणी सार्वजनिक बांधकामाच्या खात्यातील अभियंत्यांकडून सुरु आहे. परमिटपेक्षा जादा वाळू असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाळूचे वाहन घेऊन फरारी झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन मालकांना व वाहन चालकांना तहसील कार्यलयाकडून नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत. या कारवाईत उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुनील सौंदाणे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विनोद चव्हाण, मंडळ अधिकारी सी.पी.अहिरे, एस.के.खरे, एल.एम.धूम, जे.यु.सूर्यवंशी, करंजाड गावाजवळील सर्व तलाठी व कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com