गरीबीचा शिक्का पुसत पूनम पवार विद्यापीठात दुसरी

Marathi News Mhasadi News Merit Girls Second in English in Poonam Pawar University of Bhillsa Samaj
Marathi News Mhasadi News Merit Girls Second in English in Poonam Pawar University of Bhillsa Samaj

म्हसदी - आत्मविश्वास आणि चिकाटीच्या कथा क्षणभर स्फुरण आणण्यासाठी ऐकायला बऱ्या वाटतात. पण आतड्याला पिळ पडलेली असतांनाही परिस्थितीशी संघर्ष करत शिकून गरीबीचा शिक्का पुसत यश मिळवणे तितके सोपेही नाही. येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाची भिल्ल समाजातील विद्यार्थींनी पुनम बालू पवार हिने तृतीय वर्ष कला विभागात इंग्रजी विषयात विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला आहे. उच्च शिक्षण घेउन प्राध्यापक अथवा बँकेत अधिकारी होण्याची मनिषा पूनम पवारने व्यक्त केली आहे.  
  
पुनम पवार मुळची न्याहोळत येथील रहिवासी आहे. भिल्ल समाजात जन्म झाल्याने शिक्षणाचा फारसा संबंधही नाही. देऊर खुर्द (ता.धुळे) येथील मावशी रमाबाई लखा माळीच यांना मुलबाळ नसल्याने पुनमला लहानपणापासून त्यांनी दत्तक घेतले. आई-वडील बालू पवार व छोट्याबाई बालू पवार मोलमजुरी करत घर चालवतात. मावशीचे घर म्हणजे झोपडीच. तिथे विजेची वा अन्य कुठलीही सुविधा नाही. पुनमला मावशीचा आधार मिळाल्याने तिने पहिली ते बारावीपर्यंत देऊर बुद्रुक येथे शिक्षण घेतले. तेही चिमणीच्या (रॉकेलचा दिवा) प्रकाशात तिने अभ्यास केला. घरात अजूनही विजेचा दिवा नाही. घराजवळील झाडाखाली बसून पथदिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. दहावीत 59 टक्के तर बारावीत 72 % टक्के गुण मिळवत पुनमने शिक्षणात चमक दाखविली. बारावी नंतर पुनमने म्हसदीत प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला.

येथील स्वर्गीय अण्णासाहेब कला व विज्ञान महाविद्यालय होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळ देत असते. पुनमची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क वा कपडेही महाविद्यालयाकडून उपलब्ध करून दिले गेले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार देवरे, सचिव डॉ. संजीवनी देवरे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, सर्व प्राध्यापक व कर्मचा-यांनी कौटुंबिक सदस्याप्रमाणे पाठबळ दिले. आज सकाळी प्राचार्य डॉ. पाटील, उपप्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा.हेमंतकुमार पाटील, प्रा. विजय जाधव यांनी पुनमच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तृतीय वर्ष कला विभागात इंग्रजी विषयात 1322 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यात इंग्रजी विषयात पुनम पवारने बाराशेपैकी 909 गुण मिळवत विद्यापीठात दुसरा तर पुनम सुभाष देवरेने बाराशेपैकी 898 गुण मिळवत विद्यापीठात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच याच महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेतील भूगोल विषयात प्रियांका सुभाष देवरे हीने बाराशेपैकी 970 गुण मिळवत विद्यापीठात पाचवा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. पाटील, उपप्राचार्य डॉ. पाटील, प्रा. हेमंत पाटील, प्रा. रमेश अहिरे, डॉ. विजय चौधरी, प्रा. हेमंत नाद्रे, प्रा. योगेश मांसुळे यांचे मार्गदर्शन लाभले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com