जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा 

जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा 

नाशिक - त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका जमीन गैरव्यवहारप्रकरणी वहिवाटदार प्रभाकर शंकर महाजन, बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दप्तरी यांच्यासह तत्कालीन तहसीलदार तलाठी मंडल अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा आज (ता. 25) दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण "सकाळ'ने सर्वप्रथम 23 फेब्रुवारीला उजेडात आणले होते. 

त्र्यंबकेश्‍वर शिवारातील कोलंबिका देवस्थान व गंगाद्वारे ट्रस्ट्रचे गट क्रमांक 301, 321, 327, 328, 358, 323,325, 326, 322 (1) 322, (2), 324, 300 या सुमारे 175 एकर जमिनी देवस्थान इनामी जमीन असून, त्या हस्तांतरित करण्यासाठी शासन आणि धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता हस्तांतरित करून कुळ बदलले गेले. तसेच गाव फेरफार नोंद क्रमांक 1356 नुसार तत्कालीन तलाठी बी. एम. हांडोरे व तत्कालीन मंडल आधिकारी एन. एम. बिरारी यांनी कुळ बदलला मंजुरी दिली. त्यानंतर जमिनीचा अकृषक वापर सुरू असतानाही कुळ कायदा कलम 32 (अ) नुसार तत्कालीन तहसीलदार रामसिंग सुलाने आणि रवींद्र भारदे यांना अधिकार नसतानाही त्यांनी बांधकाम व्यवसायिक सचिन दिनकर दप्तरी यांचे सातबारा उताऱ्यांवर कुळ म्हणून नाव लावले. तीन दिवसांनंतर नायब तहसीलदार एस. एम. निरगुडे यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात सचिन दप्तरी व इतरांविरूद्ध विरोधात देवस्थानच्या इनामी जमीन शासन आणि धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी विनाच गिळंकृत करण्याच्या प्रकारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com