नाशिक: दुचाकी चोरणारी टोळी 21 दुचाकींसह जेरबंद

crime
crime

वणी (नाशिक) : नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरुन कमी किंमतीत विक्री करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागास यश आले असून एका अल्पवयीन बालकासह सहा चोरट्यांकडून वेगवेगळया कंपनीच्या २१ दुचाकी हस्तगत करण्यात येवून अटक करण्यात आली आहेत. 

जिल्हयातील दिंडोरी, निफाड, चांदवड, सुरगाणा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ, बॅंक परिसर, मार्केट यार्ड, शाळा-महाविद्यालय, लॉन्स आदी गर्दीच्या ठिकाणांवरून सामान्य नागरीकांच्या तसेच व्यापारी, शेतकरी,  नोकरदार यांच्या मोटर सायकली चोरीचे सत्र सुरु होते.  याबाबत जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुध्द दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्या होत्या.

याबाबत पोलिस अधीक्षक  संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी मोटर सायकल चोरीचे वाढते गुन्हयांबाबतचा आढावा व मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनूसार ता. 16 रोजी सुरगाणा तालुक्यातील तरुण नामे  विवेक उर्फ विकी भास्कर देशमुख, वय 21, रा. उंबरठाण, ता.सुरगाणा हा मोटर सायकलींची चोरी करून कमी किंमतीत विक्री करतो बाबत समजताच पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास उंबरठाण परिसरातुन ताब्यात घेतले. सदर यावेळी संशयीताकडून दोन हिरो होण्डा स्प्लेंडर प्लस मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या. सदर मोटर सायकल बाबत त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार नामे  प्रशांत बारकु भोये, रा. पिंपळसोंड, ता. सुरगाणा याचेसह सदर मोटर सायकल वणी येथुन चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपींस अधिक विश्वासात घेवुन पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे इतर साथीदार  गणेश शिवराम पवार उर्फ गण्या बाटा, रा. अलुंगन मोखपाडा, ता.सुरगाणा, विशाल सयाजी चौधरी, रा. खांदुर्डी, ता.सुरगाणा, व एक  रा. खांदुर्डी, ता. सुरगाणा येथील अल्पवयीन बालक यांचेसह नाशिक शहर, वणी, सायखेडा, लासलगाव, चांदवड तसेच गुजरात राज्यातील शहरांमधुन मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरीच्या काही मोटर सायकल हया सुरगाणा तालुकयातील त्यांचा साथीदार नामे  सलमान शब्बीर नाईक, जामुनमाथा, ता.सुरगाणा यास विक्री करण्यासाठी दिलेल्या असल्याचे तपासात निषप्न्न झाले आहे. वरील आरोपीपैकी ताब्यात घेतलेले आरोपी विकी देशमुख, सलमान नाईक, तसेच विधी संघर्शित बालक यांचे कब्जातुन त्यांचे राहते घर तसेच सुरगाणा परिसरात विक्री करीता लपवुन ठेवलेल्या 10 हिरो होण्डा स्प्लेंडर, 01 डिस्कव्हर, 01 प्लॅटीना, 01 सी. बी. झेड, 01 पल्सर, 01 शाईन, 01 पॅशन तसेच 01 यामाहा एफझेड अशा एकुण 17 मोटर सायकल किं.रू. 6 लाख 37 हजार रूपये किंमतीचा मुदेदे माल हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत वणी पोलीस ठाण्यात संशयीतां विरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेले संशयीत आरोपी हे गुजरात व महाराष्ट्र राज्यात मोटर सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार असुन मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान दुसऱ्या प्रकरणातही स्थानिक गुन्हे शाखेचे दुसरे पथकाने मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे धुळे जिल्हयातील संशयीत इसम नामे परशराम नानाजी बागुल, रा. शिवपाडा, ता. साक्री, जि.धुळे हा मोटर सायकलींची चोरी करून कमी किंमतीत विक्री करतो बाबत समजले वरून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास पिंपळनेर परिसरातुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसमास विश्वसात घेवुन चैाकशी केली असता त्याचे कब्जातुन 01 जांभळया रंगाची टि. व्ही. एस. स्टार, 01 लाल रंगाची हिरो होण्डा पॅशन, 02 काळे रंगाच्या हिरो होण्डा स्प्लेंडर अशा एकुण 04 मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकल व आरोपीस पुढील तपासकामी जायखेडा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असुन अधिक तपास चालु आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव  हर्श पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सपोउनि रामभाउ मुंढे, रवि शिलावट, पोहवा हनुमंत महाले, दिपक आहिरे, जे. के. सुर्यवंशी, नामदेव खैरणार, कृष्णा भसरे, अशोक जगताप, सुधाकर खरोले, पोलिस नाईक वसंत खांडवी, जालिंदर खराटे, अमोल घुगे, पोकॉ हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गणेश पवार, संदिप लगड, राजु वायकंडे या पथकाने वरील आरोपी तसेच चोरीच्या मोटर सायकलींचा शोध घेवुन मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. 

दरम्यान जप्त करण्यात आलेल्या एकुण 21 मोटर सायकलींचे नंबर गुन्हेगारांनी बदलेले असुन ते बनावट आहे. जप्त करण्यात आलेल्या काही मोटर सायकलचे मुळ मालकांचा शोध लागलेला नाही. ज्या नागरीकांच्या मोटर सायकल चोरीस गेल्या असेल त्यांनी चेसिज नंबर व इंजिन नंबर वरून खात्री करून स्थानिक गुन्हे षाखा कार्यालय फोन नंबर ०253-2309710, तसेच वणी पोलीस ठाणे दुरध्वनी क्र. 02557-220133 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com