पुन्हा एकदा ग्राहक व स्टेट बँक कर्मचाऱ्यात उडू लागले खटके 

पुन्हा एकदा ग्राहक व स्टेट बँक कर्मचाऱ्यात उडू लागले खटके 

नांदगाव छ येथील स्टेट बँकेच्या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी आता पुन्हा एकदा वाढीला लागल्या आहेत सीडीएम मशीन मधील पैसे भरणा केल्यांनतर बहात्तर तासाचा अवधी उलटून गेल्यावर देखील खात्यावर जमा झाल्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

दरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ग्राहकाला त्यासंदर्भातली माहिती न देण्याच्या वाढत्या प्रकारामुळे  ग्राहक व बँकेच्या कर्मचाऱ्यांत विवाद वाढू लागल्याच्या घटनाक्रमात या निमित्ताने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान बँकेचे व्यवस्थापक श्रीधर आसोलकर यांनी या प्रकारचा इन्कार करतांना ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात समन्वय व सवांदा  अभावी असे घडू शकते असा बचावात्मक खुलासा केला.

उत्तर प्रदेशातील मोहमद रिजवान यांनी नांदगावच्या स्टेट बँकेच्या शाखेतील सीडीएम मशीनला एम के टेक्स्टाईल्स च्या खातेक्रमांक ३६२७२९७३४९८ मध्ये ५००च्या ३३ नोटा व २००० च्या ४ नोटा एकुन २४५०० रु  भरले. त्याला तीन दिवस झाले म्हणून सदर खात्यावर भरणा केलेली रक्कम जमा झाली अथवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी गेलेल्या या ग्राहकाला त्याचे समाधान करून देण्याऐवजी बँकेच्या काउंटर दोनवरील कर्मचाऱ्याकडून दुरुत्तरे मिळाली.

असाच काहीसा मात्र वेगळा प्रकार गेल्या आठवड्यात घडला  कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश संबंधित व्यापाऱ्याच्या खात्यावर जमा होऊन देखील शेतकऱ्याला त्याच्या खात्यावरचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता.

यापूर्वी स्टेट बँकेच्या स्थानिक तात्कालिक व्यवस्थापका सह कर्मचारी ग्राहकांना दुरुत्तरे देत अवमान करीत असल्याच्या निषेधार्थ  बँके समोर रास्तारोको करण्यात आले होते. बँकेच्या व्यवस्थापकाच्या लहरीपणाचा परिणाम म्हणून वाढत्या तक्रारी नंतर सदर वादग्रस्त व्यवस्थापकाची बदली झाली. त्यानंतर बँक ग्राहक यांच्यातला सुसंवाद आता कुठे निर्माण होत असतांना काही कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना सौजन्यपुर्वक माहिती देऊन समाधान करण्या ऐवजी दुरुत्तरे दिली जात असल्यामुळे  वरिष्ठ यंत्रणेने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com