शिवसेनेच्या पक्ष निरीक्षकांचे बंद खोलीत उमेदवारीसंदर्भात चाचपणी

yeola
yeola

येवला : लोकसभा,विधानसभा तसेच विधानपरिषद निवडणुका जवळ येऊ लागल्याने वातवरण चांगलेच रंग धरू लागले आहे.शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी पक्ष निरीक्षक म्हणून येथे संपर्क दौऱ्यासाठी आले होते.या अभियानात त्यांनी एकत्रितपणे अवघी काही मिनिटे सवांद साधला आणि नंतर प्रतेकाशी बंद खोलीत गुप्तगु केले.बंद दरवाजाआड काय चर्चा झाली हे मात्र पदाधिकारी सांगायला तयार नाही.

पक्षाच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत निरीक्षक म्हणून गुरुवारी (दि.२२) शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख माळी यांनी प्रथमच येथील दौरा केला.जेष्ठ नेते छगन भुजबळ येथे येण्यापूर्वी हा मतदारसंघ सलग १० वर्ष पक्षाच्या हातात होता.आता पुन्हा हि संधी चालून आली असून पवार व दराडे हे दोन प्रमुख नेते पक्षात असल्याने नक्कीच ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व नगरपालिकेत सत्तेच्या चाव्या हातात असल्याने आता मिशन विधानसभा हे उद्दिष्ट पक्षासमोर असल्याचे यातून दिसून येत आहे.याचमुळे मेळावे व बैठका वाढल्याचे दिसून येत आहे.  

गुरुवारी येथे आलेल्या माळी यांनी अगोदर बैठक घेऊन उपस्थित पदाधिकारी,गट-गणप्रमुख व कार्यकर्त्याशी दोन-पाच मिनिटे उघड संवाद साधला व संघटनाचे महत्व समजावले. त्यानंतर प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा केली जाईल असे जाहीर करून त्यांनी बंद खोलीत केवळ एक-एकाला स्वतंत्रपणे बोलवत चर्चा केली. बंद दरवाजा आडच्या या गुफ्तगूत नेमकी काय चर्चा आणि संवाद झाला, हे मात्र बाहेर आले नाही. बंद खोलीत हि चर्चा सुरु होण्याअगोदर तालुक्यातील सेनेतील नेतेमंडळी अन् काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमवेत हजेरी लावत अवघे काही मिनिटे चर्चा केली. त्यानंतर माळी यांनी केवळ प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या मत जाणून घेतले.

येव्ल्यासह निफाड तालुक्यातील ४२ गावांमधील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तब्बल पाच तासांच्या वर निरीक्षकांनी उपस्थित प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा केली.यात संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे.शिवसेनचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी देखील यावेळी भेट दिली.मात्र, बंद खोलीत चर्चा होताना त्यांनी देखील खोलीबाहेरच राहणे पसंत केले.यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे,माजी सभापती संभाजी पवार,तालुकाप्रमुख झुंझार देशमुख,शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com