राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची सुरुवात येवल्यातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

येवला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा 16 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान नाशिक जिल्ह्यात येत आहे. याची सुरुवात येवला येथून होणार असून शुक्रवारी (ता. 16) या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या विरोधातील नाकर्त्या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल मोर्चाचे राज्यभर आयोजन केल आहे.

या मोर्चात राज्‍याचे माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष सु‍निल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, जयंत पाटील व अन्‍य नेते सहभागी होणार आहेत. येथील सभेनंतर सर्व नेते येथेच मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता निफाड येथे सभा, दुपारी 2 वाजता दिंडोरी येथे सभा व कळवण येथे 5 वाजता सभा होणार असून सप्तशृंगी गड येथे मुक्काम होणार आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला हल्लाबोल मोर्चा सटाणा येथे दाखल होणार असून येथे सभा होणार आहे.

त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील यात्रेचा समारोप होऊन यात्रा पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच 10 मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे जाहीर सभा होणार आहे.शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे हल्लाबोल यात्रेत पक्षकार्यकर्त्यांबरोबरच सर्व सामन्य नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार जयवंत जाधव यांनी केले आहे.

Web Title: Marathi news north maharashtra news hallabol agitation