शाळेला छत्रपतींच्या साडेतीनशे पुस्तकांची भेट देऊन शिवजयंती साजरी

Igatpuri
Igatpuri

इगतपुरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचे संवर्धन व भ्रमंती करणारी गडवाट ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहे या वर्षी राज्यात पंधरा शाळांना पुस्तकं प्रदान करून ज्ञानवर्धक शिवजयंती साजरी करत इगतपुरी तालुक्यात खंबाळे हे गाव निवडून येथील जिल्हा परिषद शाळेला तब्बल साडेतीनशे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन डॉ पंकज भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमितशेठ कानडे, डॉ. उत्तम फरताळे, माहेश्वरी कळमकर, डॉ. नितीन बस्ते, डॉ. गायकवाड, काँग्रेसचे विधानसभा प्रभारी भास्कर गुंजाळ शाळेच्या मुख्याध्यापिका मानिषा केदारे व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिजाऊ वंदना सोनल पाटील यांनी घेतली तर गडवाट संस्थेविषयी माहिती भारती जाधव यांनी देत महाराष्ट्रात शिवरायांचे जवळपास साडेतीनशे ते चारशे किल्ले आहेत त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ऐंशीच्या आसपास किल्ले असताना या संस्थेने मोहीम चालू करून उभ्या महाराष्ट्राला किल्ल्यांचे महत्त्व पटवुन दिले आहे.
त्यात इगतपुरी तालुका व परिसरातील किल्ले यांची माहिती समाधान मते या गडवाटकऱ्याने देत उपस्थितांना भुरळ घातली.

यावेळी शाळेच्या वतीने उपशिक्षक भिला अहीरे यांनी सर्वांचे आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इगतपुरी तालुक्यातील जेष्ठ गडवाटकरी व तालुक्याला महाराष्ट्रात पोहोचवणारे ईश्वरबाबा सहाणे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रा किशोर कळमकर, अक्षय भावले ,विश्वास तांबे यांच्यासह मोठ्या प्रमाणात गडवाटकरी उपस्थित होते यावेळी स्थानिक शिवभक्त समाधान शिंगोटे, अनिल पढेर,रेवन पढेर आदींनी मेहनत घेतली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com