खडसेंना मंत्रिमंडळात घ्या : जळगावात भाजप बैठकीत घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

खडसे यांचे मंत्रीमंडळात पुनवर्सन करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्र्याची भेट घ्यावी आणि वेळ पडल्यास मुंबईत मोठा मोर्चा आयोजित करावा.

- माजी आमदार बी.एस.पाटील

जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरील कोणतेही आरोप सिध्द झाले नाहीत. त्यांचे मंत्रीमंडळात त्वरीत पुनवर्सन करावे, अशी मागणी करीत जळगाव भाजप जिल्हा बैठकीत आज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी ठराव मंजूर करण्याचीही मागणी करण्यात आली. 

जळगावातील औद्यौगिक वसाहतीतील बालाणी रिसॉर्ट येथे भाजपची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, उन्मेश पाटील, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, चंदूलला पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यानी खडसे यांना मंत्रीमंडळात घ्यावे असा ठराव करण्याची मागणी केली. माजी आमदार बी.एस.पाटील यांनी खडसे यांचे मंत्रीमंडळात पुनवर्सन करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्र्याची भेट घ्यावी आणि वेळ पडल्यास मुंबईत मोठा मोर्चा आयोजित करावा अशी सूचना बैठकीत केली. 

यावेळी कार्यकर्त्यांनी नाथाभाऊ आगे बढो अशा घोषणाही दिल्या. यावेळी खडसे बोलतांना खडसे यांनी पक्षाची शिस्त कार्यकर्त्यांनी पाळली पाहिजे, असे अवाहन केले.

आणखी वाचा :

रावसाहेब दानवे खडसेंबद्दल म्हणतात...