जागा संपादनाच्या मुद्यामुळे स्मार्ट रोड सापडणार वादात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही. तोच स्मार्ट रस्ता तयार करताना दोन्ही बाजुला एक सारखी रुंदी मिळविण्यासाठी रस्ता सन्मुख मिळकतींसमोरील जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव आल्याने स्मार्ट रोड प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रोड तयार करावयाच्या कामाला सुरुवात होत नाही. तोच स्मार्ट रस्ता तयार करताना दोन्ही बाजुला एक सारखी रुंदी मिळविण्यासाठी रस्ता सन्मुख मिळकतींसमोरील जागा संपादीत करण्याचा प्रस्ताव आल्याने स्मार्ट रोड प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहे. यापुर्वीच नगरसेवकांनी आधी शहरातील ग्रामिण भागात रस्ते तयार करा त्यानंतर स्मार्ट रोड साठी करोडो रुपये खर्च करण्याची मागणी केल्याने स्मार्ट सिटी प्रकल्प अडचणीत आले असताना आता स्मार्ट शहर उभारताना सद्यस्थितीतील मिळकतींना धक्का लागण्याच्या शक्‍यतेने नागरिक धास्तावले आहेत. 
स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पापैकी अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान स्मार्ट रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित आहे. दोन आठवड्यांपुर्वी स्मार्ट सिटी कंपनी संचालकांची बैठक झाली त्यात सोळा कोटी रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी देण्यात आली.त्यासाठी नाशिक मधीलचं सी-फोर इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला काम देण्यात आले. पुढील सहा महिन्यात रस्त्याचे काम पुर्ण करणे अपेक्षित आहे. रस्ते कामाला संबंधित कंपनीकडून सुरुवात झाली असून त्यात प्रथम रस्त्याचे मोजमाप घेण्याचे काम पुर्ण कण्यात आल्याने त्यातून अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान रस्त्याला एक सारखी तीस मीटर रुंदी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सिबीएस ते मेहेर दरम्यान तीस मीटरची रुंदी प्राप्त होते. परंतू मेहेर ते अशोक स्तंभ तसेच सिबिएस ते त्र्यंबक नाका दरम्यान रस्त्याची रुंदी कमी असल्याने समान रस्ता तयार होवू शकतं नाही. त्यासाठी जेथे रस्ता कमी भरतो तेथे रस्त्या लगतच्या मिळकतींसमोरील जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. स्मार्ट रोडचे काम करणाऱ्या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले असल्याने तीस मीटर रुंदीची जागा मिळविण्यासाठी कलम 210 अन्वये भूसंपादन करण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या अर्बन टाऊन प्लॅनर कडून सादर करण्यात आल्याचे समजते. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान जुनी दुकाने, शाळा, जिल्हा बॅंक, शासकीय ईमारती हॉटेल, पेट्रोल पंप आहे. काही मिळकती वादात असल्याने स्मार्ट रोड प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहेत. 

स्मार्ट रोड मध्ये 
1.1 किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. स्मार्ट रोडवर ऑफ रोड, ऑन रोड पार्किंग सह अत्याधुनिक सिग्नल, वाय-फाय, ऑप्टीकल फायबरचे जाळे, सिसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. रस्ता उभारणीसाठी साधारण सोळा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 

Web Title: MARATHI NEWS SMART ROAD IN TROUBLE