बिकानेरच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी साकारली कार 

residenational photo
residenational photo

नाशिकः अभियांत्रिकीचे विद्यार्थी कार्यशाळेच्यानिमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी त्यांनी एक आसनी कार निर्मितीचा विचार केला असतांना त्यांना पॉलिरिस कंपनीच्या रॅली कार डिझाईन चॅलेंज स्पर्धेची माहिती मिळाली. कुठल्याही रस्त्यावर धावेल, अशी स्वतः डिझाईन अन्‌ निर्मिती कारचे आव्हान त्यांनी स्विकारले. त्यानुसार नाशिक, मुंबई, पुणे, रायगडच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत बिकानेर येथे 23 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाशिकमध्ये दोन आसनी कार साकारली. 

नाशिकच्या सपकाळ नॉलेज हब, संदीप फाऊंडेशन, सर विश्‍वेश्‍वरैय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि इतर महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांनी "टिम रिबेल' स्थापन केली. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. मुंबईचा हर्ष शाह कर्णधार आहे. रोहन कुंभार आणि सर्वेश आर. व्ही. या दोघांनी कार निर्मितीमध्ये विशेष लक्ष दिले.बंगळूरूमध्ये प्रशिक्षण घेतल्यावर सर्वांनी एकत्र येत पंधरा दिवसांमध्ये नाशिकमध्ये डिझायनींग अंतिम केले.याशिवाय विविध प्रकल्प अहवाल सादर केल्यावर पॉलिरिस कंपनीच्या अभियंत्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर कारच्या निर्मितीला सुरवात झाली. 
आर्थिक सहाय्यचे अन्‌ भक्कम पाठबळ 
अमेरिकेतून सस्पेशन मागवण्यात आले. मारुती कारच्या इंजिनच्या साहित्याचा वापर केले. पुण्याहून डिझायनरचे टायर आणले. हे सारे होत असताना अर्थसहाय्याची मोठी अडचण तयार झाली. अशावेळी चौधरी यात्रा कंपनीने अर्थसहाय्याचे पाठबळ दिल्याची माहिती हर्षने हॉटेल 24 सेव्हनमध्ये झालेल्या पत्रकार परिषेदत दिली. सर्वेश म्हणाला, नाशिकचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचावे,यासाठी चौधरी यात्रा कंपनीचे अध्यक्ष प्रेमचंद चौधरी, संचालक चतुर्भुज चौधरी, महेंद्रपाल चौधरी, ब्रिजमोहन चौधरी, रघुवीर चौधरी यांनी सहकार्य केले. नाशिकमधील जीएडी मोटर्स व श्रीगुरु ऑटो वर्क्‍समध्ये कार तयार करण्यात आली आहे. कारचे वजन 500 किलोग्रॅमपेक्षा कमी आहे. संघाचा उपकर्णधार रोहन असून राकेश जाधव, शहाबाज शेख, चेतन दाभाडे, शीतल पाटील, पूजा निखाडे, रेवत थोरात, प्रसाद खरटमल, ऋषिकेश संकपाळ, गणेश सूतार, गुंजण हळनकर, अक्षय सावंत, अंकीत सावंत, सौरभ जोशी, मनोज यादव यांचा संघात समावेश आहे. शहाबाज हा कार चालवणार असून प्रसाद सहचालक(नेव्हीगेटर) म्हणून साथ देणार आहे. 

आंतरराष्ट्रीय धावपटूंची उपस्थिती 
अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये तयार केलेल्या कारचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी नाशिक, मुंबई, पुणेच्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी सावरपाडा एक्‍सप्रेस कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव या आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या जोडीलाच त्यांचे प्रशिक्षक विजयेंद्र सिंग उपस्थित होते. कार रॅलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत कारमध्ये बसण्याचा आनंद धावपटूंनी घेतला. 

बिकानेरमधील स्पर्धेसाठी देशातील 30 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील दहा विजेत्यांना जागतिक स्पर्धेत व्यावसायिक स्पर्धकांसमवेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नाशिकमधील "टॅलेन्ट' जगापुढे येण्यास मदत होणार आहे.'' 
 ब्रिजमोहन चौधरी (संचालक, चौधरी यात्रा कंपनी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com