वाहन कर्जाची प्रकरणे करून बॅंकांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक : बॅंकांची अब्जावधी रुपयांची फसवणूक करणारी प्रकरणे देशभर गाजत असताना नाशिकमध्येही विवेक उगले नामक ठगाने राष्ट्रीयकृत बॅंकांना वाहन कर्जाच्या प्रकरणांतून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

आठवडाभरात संशयिताविरोधात दोन गुन्हे दाखल झाले असून एका बॅंकेने जाहीर नोटीसही बजावली आहे. संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही तर दुसरीकडे बॅंकांमध्ये नामांकित शोरुमच्याच नावाने बनावट खाते सुरू करून, त्याची शहानिशाही बॅंकांकडून होत नाही.  बॅंक कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच शहरात बॅंकांची लुट करणारी टोळीच कार्यरत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

विवेक अरुण उगले (23, रा. सायली रो-हाऊस, नंदनगर, पाथर्डीफाटा) असे बॅंकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगाचे नाव आहे. गेल्याच आठवड्यामध्ये ऍक्‍सिस बॅंकेची 6 लाख 75 हजार रुपयांच्या वाहनकर्जाच्या रक्कमेप्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल झाला आहे. तर, काल (ता.2) इंदिरानगर पोलिसात 16 लाख रुपयांचा गंडा वाहन कर्जाच्याच प्रकरणातून स्टेट बॅंकेला घातला आहे. 

पाथर्डी फाटा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे मोतीराम शांताराम पवार (रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या फेब्रुवारी 2018 मध्ये संशयित विवेक अरुण उगले व दयानंद संजय पठाडे (27, रा. साईदर्शन रो-हाऊस, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी बॅंकेकडे 16 लाख रुपयांच्या वाहन कर्जाचे प्रकरण केले होते. त्यासाठी त्यांनी स्टर्लिंग मोटर्स व टाटा मोटर्स या नामांकित शोरुमचे बनावट कोटेशन आणि डाऊन पेमेंट भरण्याचे बनावट व्हाऊचर तयार करून कर्जप्रकरण सादर केले. त्याचवेळी संशयितांनी बॅंकेत स्टर्लिंग मोटर्स या नावाने बनावट खाते उघडले. 16 लाख रुपयांचे वाहन कर्ज प्रकरण मंजूर झाले असता, ती रक्कम त्यांनी बनावट खात्यावर वर्ग करून त्या रक्कमेचे वाहन खरेदी न करता पैसे काढून घेत बॅंकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  गेल्याच आठवड्यात 28 तारखेला अंबड पोलिसातही गुन्हा दाखल असून, यातही संशयित विवेक उगले याने ऍक्‍सिस बॅंकेकडे 6 लाख 75 हजार रुपयांचे कर्जप्रकरण करून, याचप्रकारे कंचन मोटर्सच्या नावे बनावट खाते उघडून बॅंकेची फसवणूक केली आहे. तर शहरातील एका सहकारी बॅंकेनेही बॅकेचे 6 लाख 66 हजार रुपयांचे थकबाकीदार म्हणून जाहीर नोटीस बजावली असून मुदतीमध्ये बॅंकेकडे संपर्क न साधल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. 
 
बॅंकांची भूमिका संशयास्पद 
एरवी, सर्वसामान्यांना बॅंक खाते उघडण्यासाठी एक ना अनेक कागदांसाठी सतत फेऱ्या माराव्या लागत असताना, संशयित विवेक उगले याने मात्र नामांकित वाहनांच्या शोरुमच्याच नावाने बनावट खाते सुरू केले. त्याची साधा संशयही संबंधित बॅंकांच्या अधिकाऱ्यांना आला नाही की त्याची चौकशीही केली गेली नाही. त्यामुळे लाखों रुपयांचा चुना लावणाऱ्या संशयित उगले याच्या गुन्ह्यात बॅंकांचेही कर्मचारी वा अधिकारीही सामील असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

बॅंकांची फसवणुकीचे अनेक प्रकरणे सध्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. केवळ बॅंकांच्या निष्काळजीपणामुळेच फसवणूक होते. तर पोलिसांकडून संथगतीने अशाप्रकरणाचा तपास केला जातो. संशयितांविरोधात संघटित गुन्हेगारी अन्वये (मोक्का) कारवाई करण्याची गरज आहे. 
- ऍड. जालिंदर ताडगे, सचिव, नाशिक बार असोसिएशन. 
 
Web Title: marathi news vehicle and bank cheating