पावसाने तारले, नियोजनाने मारु नये 

पावसाने तारले, नियोजनाने मारु नये 

नाशिक ः धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिकला सलग दोन वर्षापासून शंभर टक्के पाउस झाल्याने पाण्याची स्थिती बरी आहे. मार्चच्या मध्यापर्यत जिल्ह्यात 45 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत सहा टक्के अधिक साठा असल्याने पावसाळा सुरु होईपर्यत पाणी पुरणार आहे. पावसाने तारले आहेच, उन्हाळ्यात पाणी पळवापळवीचे राजकारण झाल्यास पावसाने 125 टक्के तारुनही नाशिकला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका आहे. 

   जिल्ह्यात 7 मोठे आणि 17 मध्यम अशा 24 धरण आहेत. वैतारणेद्वारे मुंबई, गोदावरीतून नांदेडपर्यत आणि दमणगंगेद्वारे थेट गुजरातपर्यत अशा सुमारे राज्यात 40 टक्के भूभागाला पाणीपुरवठा होणाऱ्या नाशिकमधील 24 धरणात 29770 दशलक्ष घनफूट पाणी आहे. मनमाड, येवल्यासह ग्रामीण तालुक्‍यात टंचाई सुरु झाली आहे. दोन ते तीन सिंचनाच्या आवर्तन बाकी आहे.

पुढील महिण्यात पाण्याचे सिंचनाच्या आवर्तनामुळे पाण्याचा वापर हा कळीचा मुद्दा असणार आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहरातील पाण्याची स्थिती जरा चांगली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, काश्‍यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणात 6591 दशलक्ष घनफूट (64 टक्के) पाणीसाठा आहे. 

निर्णय महत्वाचे 
पाणीसाठ्याचा विचार करता, नाशिकला पुरेसे पाणी आहे. पण जसजसा उन्हाळा तीव्र होत जातो. तसतसे पाण्याचे राजकारण सुरु होते. मराठवाड्यापासून तर नांदेडपर्यतच्या भागाची तेथील सिंचन, उद्योगांची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे मराठवाड्यातून पाण्याचा आक्रोश वाढू लागताच, एका नाशिकवर अन्याय करीत, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला न्याय दिल्याचा "मेसेज' देत राजकिय लाभ मिळविण्यासाठी पाण्याची पळवापळवी झाली तर मात्र नाशिककवर पाणीटंचाईचे संकट घोंघावू शकते. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पावसाने शंभर टक्केवर तारले असले तरी, पुढील महिण्यात पाणीपळवापळवीच्या राजकीय हस्तक्षेपावर पाणीटंचाईचे चित्र अवलंबून राहील.असे चित्र आहे. 


पाणीबचतीचे प्रयत्न 
धार्मिक तिर्थस्थळ असलेल्या नाशिक शहराची 20 लाख लोकसंख्या आहे. प्रमुख ज्योर्तीलिंग त्र्यंबकेश्‍वर, साडे तीन पिठापैकी अर्धे पिठ वणी, नजिकच शिर्डी, पंचवटीसह 
विविध भागाला प्रतिदिन भेट देणाऱ्या 80 ते 90 हजारावर पर्यटकाची तरलती लोकसंख्या आहे. त्यामुळे रोज साधारण 420 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज असते. सध्या 
20 टक्के नळांना मीटर नाही, जुन्या जलवाहिण्यामुळे गळतीचे प्रमाण 40 टक्के आहे. हे रोखण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाच्या आधारे शंभर टक्के पाणीगळती रोखण्याचे नाशिक 
महापालिकेचे नियोजन आहे. त्यात 40 टक्केपैकी 10 ते 12 टक्के गळती रोखली गेली तरी, प्रतिदिन किमान 50 दशलक्ष घटफूट पाण्याची बचत होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com