शहीद जवानांच्या वीरमाता-पत्नींचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

जळगाव - देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी तसेच वीरमाता- पत्नींचा सन्मान आज करण्यात आला. अ. रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. बिग्रेडियर विजय नातू यांच्या हस्ते जिल्हा सैनिक भवनात सकाळी दहाला कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

अध्यक्षस्थानी सुनील कदम, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, कर्नल आशुतोष मुखर्जी, कर्नल अनुप अग्रवाल, कर्नल पी. आर. सिंह, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डीवायएसपी सचिन सांगळे, मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी श्री पटवे यांनी सुरेश भट लिखित ‘नात’ चे सादरीकरण केले. यावेळी वीर पत्नी व माता यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबीरात शहिद सैनिकांच्या २०० कुटुंबीयांची हृद्‌य, स्त्री रोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा आदी आजारांचे डॉ. राधेश्‍याम लोढा, डॉ. मनीषा चौधरी, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. सुशांत सुपे, डॉ. नितीन विसपुते, डॉ. मेराज नगावकर यांनी तपासणी केली. आयोजनाबद्दल कर्नल नातू, कर्नल कदम यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांना सन्मानपत्र देवून सत्कार केला.  नदीम मलिक, गालिब हुसैन शेखू पेंटर, भीमराव पाटील, सय्यद इरफान, शरीक मलिक, रहीम मलिक, फहद मलिक यांनी सहकार्य केले. 

सत्कारार्थी वीरमाता- पत्नी
निर्मला सुवालाल हनुवते, इंदूबाई सुभाष पाटील, कल्पना विलास पवार, सरला भानुदास बेडीसकर, कविता राजू सावदे, अनुपमा एस. पाटील, रंजना अविनाश पाटील यांचा तर वीर मातांमध्ये चंद्रकला अरुण जाधव, सुनंदा पाटील, शैला सांळुखे यांचा सत्कार केला.