भाजप निवडणूक समितीतून खासदार चव्हाणांना "अर्धचंद्र' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - नाशिक महापालिकेपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा समावेश राहिला आहे. या वेळी मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठीच्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीतून श्री. चव्हाण यांना वगळण्यात आले आहे. नेमके हे असे का घडले, याबद्दलचे आखाडे बांधले जात असतानाच श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या मुलाने कळवण तालुक्‍यातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली आहे.

नाशिक - नाशिक महापालिकेपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा समावेश राहिला आहे. या वेळी मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठीच्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीतून श्री. चव्हाण यांना वगळण्यात आले आहे. नेमके हे असे का घडले, याबद्दलचे आखाडे बांधले जात असतानाच श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या मुलाने कळवण तालुक्‍यातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांना कळवणमध्ये वेळ मिळावा, यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, असेही बोलले जात आहे. 

महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांमधील नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तसेच, श्री. चव्हाण यांचा सामाजिकस्तरावर ग्रामीण-आदिवासी भागासह शहरात संपर्क आहे. पण, तरीही पक्षाला त्यांचा विसर कसा पडला, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपच्या निवडणूक समितीतर्फे उद्या (ता. 17)पासून तीन दिवस इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू होईल. पालकमंत्री गिरीश महाजन हे मुलाखतींसाठी थांबणार नाहीत. पण, 14 जणांच्या समितीत अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गालफाडे यांचा समावेश आहे. हीच बाब आता श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनी अधोरेखित करण्यास सुरवात केली आहे. पक्षातर्फे श्री. चव्हाण यांची नाराजी आता कशी घेतली जाणार, यावर त्यांच्याकडून शहराला मिळणारा वेळ अवलंबून असेल, हे मात्र नक्की.