टॅंकरने चिरडल्याने मातेसह चार चिमुकल्यांचा मृत्यू

टॅंकरने चिरडल्याने मातेसह चार चिमुकल्यांचा मृत्यू

मुक्ताईनगर - मुंबई- नागपूर महामार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास एका भरधाव टॅंकरने मातेसह तीन चिमुकल्यांना चिरडले; तर एक वर्षीय मुलाचा जळगावात उपचार घेताना मृत्यू झाला. या अपघातात दोघे जण बचावले असून, घटनेनंतर टॅंकरचालक पसार झाला आहे. हा अपघात घोडसगाव ते चिखली गावादरम्यान हॉटेल गजाननजवळ झाला.

घोडसगाव येथून आज गोधन पवार हे आपल्या कुटुंबासह चिखली गावाकडे जात होते. या वेळी गोधन व त्यांचा मुलगा सायकलीवर, तर त्यांची पत्नी व चार मुले महामार्गावरून पायी जात होते. या वेळी हॉटेल गजाननजवळ मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या टॅंकरने या कुटुंबाला चिरडले.

यात अमरसिंग गोधन पवार (वय 13 महिने), निम्मीबाई गोधन पवार (वय 38), अल्कोस पवार (वय 8), उड्डीया गोधन पवार (वय 6) हे चौघे मायलेक जागीच ठार झाले; तर टॅंकरचा फटका बसल्याने निहाल गोधन पवार (वय 12) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगाव येथे हलविले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातातून कुटुंबातील गोधन व नेहाबाई पवार हे दोघे किरकोळ जखमी झाल्याने बचावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com