धुळे: खून करुन कारसह जाळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली. मृत माळी यांना नंदुरबार येथील हिस्याचे घर विकायचे होते. मात्र भाऊ, बहिणी स्वाक्षरी देत नव्हते. यातून माळी कुटूंबात टोकाचा वाद सुरू होता. 

साक्री (जि. धुळे) - साक्री शहरात मध्यरात्री समता परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व साक्री पाटबंधारे विभागातील वाहनचालक गोकुळ रतन माळी यांचा स्वतःच्या चारचाकी वाहनात जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. तोंडात बोळा कोंबलेला व गळा सीटला बांधलेला, अशा अवस्थेत मृतदेह दिसत होता. 

साक्री शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत तहसिल कार्यालयासमोर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयीन आवारात माळी यांना ठार मारून वाहनात हातपाय बांधून डांबल्यानंतर जाळून टाकण्यात आल्याचा कयास आहे. ही थरारक व अंगावर शहारे आणणारी घटना साक्री पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. मृत माळी यांचा मुलगा धीरज याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. 

प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडली. मृत माळी यांना नंदुरबार येथील हिस्याचे घर विकायचे होते. मात्र भाऊ, बहिणी स्वाक्षरी देत नव्हते. यातून माळी कुटूंबात टोकाचा वाद सुरू होता. 

संशयितांना पहाटे तीनला पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतले. काशीराम गजमल माळी, तुकाराम काशीराम माळी, प्रल्हाद कृष्णा माळी, विजय कृष्णा माळी यांना नंदूरबार येथून ताब्यात घेतले गेले.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - एमआयडीसीच्या जमिनीबाबत 1995च्या परिपत्रकाची स्थिती काय, असे वारंवार विचारल्यानंतर अखेरीस सरकारने हे परिपत्रक नुकतेच...

12.18 AM

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20)...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

चिमूर : तालुक्‍यातील हळद उत्पादकांना नावीन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन म्हणून मिळणारे अनुदान काजळसर...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017