खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही: राज्यपाल

मुंबई : येथील राजभवनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन देतांना कार्याध्यक्ष तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकीभाऊ जाधव व
मुंबई : येथील राजभवनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन देतांना कार्याध्यक्ष तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकीभाऊ जाधव व

इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.

सरकारी सेवेतील व सरकारी इतर उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र तपासणे बद्दल 18 मे 2013 रोजी तत्कालीन मुख्य सचिव यांनी काढलेल्या जी. आर. ची तात्काळ अंमलबजावणी होणे करणे, आदिवासींच्या जमिनी व्यतिरिक्त इतरांना विक्री करीता परवानगी न देणे, धनगर समाजाला आदिवासी म्हणून महाराष्ट्राच्या यादीत समावेश न करणे, आदिवासी विभागाच्या अर्थ संकल्पाला लावलेली कपात रद्द करणे, केळकर समितीच्या अहवालातील आदिवासी करितांच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, पेसा कायद्यातून सुटलेल्या गावांचा समावेश पेसामध्ये करणे, 6 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्ट न्या. जगदीश सिंग खेहर, न्या. एन. व्ही. रामना, न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, सामाजिक न्याय विभागाने रक्त नाते संबंधावर जात वैधता प्रमाणपत्र इतर नातेवाईक यांना इतर कागदपत्रांची तपासणी न करता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबंधी मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय आदिवासी विभागास लागू करू नये, रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देणेबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आदिवासी विभागाला करु नये, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, आश्रमशाळातील रिक्त पदे तात्काळ भरणेबाबत या व आदी विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावर महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले की, या सर्व विषयांची सकारात्मक अंमलबजावणी करण्यात येईल व आदिवासींवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले

याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महासचिव रामसाहेब चव्हाण, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकीभाऊ जाधव अशोक आत्राम, सुहास नाईक, डॉ. तुमराम, नागपूर अध्यक्ष दिनेश शेराम चंद्रपूर अध्यक्ष केशव तिरणीक अहमदनगर अध्यक्ष निवृत्ती घोडे, डॉ. सुपे, जाणू हिरवे, संतोष साठे, भरत घाणे, श्री. भवारी, दिलीप पटेकर, डॉ. नामदेव राव किरसान, विजय खूपसे, किशन मिराशे, दादाराव टारपे, विजय खूपसे, सखाराम वाकोडे, जयवंत देशमुख आदी उपस्थित होते

बोगस हटाव, आदिवासी बचावसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा
महामहिम राज्यपाल यांची भेट झाल्यानंतर आदिवासीहृदय सम्राट मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आलेल्या सर्व आदिवासी बांधवाना नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्यासाठी नियोजन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com