शेतकरी संघटनेच्या बंदला शहाद्यात हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारलेल्या शहादा बंदला आज (सोमवार) हिंसक वळण लागले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

हमी दराने धान्य खरेदीसाठी स्वाभिमान संघटनेतर्फे आंदोलन पुकारण्यात आले होते. शहादा येथे पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी महारू पाटील, पोलिस निरिक्षक संजय शुक्ला यांनी उपोषणकर्ते संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, युवाध्यक्ष सचिन पाटील यांना उपोषणस्थळावरून ताब्यात घेतले आहे. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

दरम्यान, भाजीमंडईतील व्यापाऱ्यांनी बंदला विरोध करत पोलिसांकडून संरक्षण मागीतले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अचानक भाजीमंडईत मारहाण सुरू करत दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविले. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी धरपकड सुरू आहे.

Web Title: nandurbar swabhimani shetkali sanghatana morcha police