स्थायी सदस्य नियुक्तीसाठी 30 मार्चला महासभा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नाशिक - स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नियुक्तीसाठी गुरुवारी (ता. 30) सकाळी साडेअकराला महासभा होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीवर निवड होण्यासाठी "फिल्डिंग' लावली जात आहे. स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करण्याचे प्रयत्न आहेत. विभागीय आयुक्तांकडून सोमवारी (ता. 27) नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. नोंदणी झाल्यास स्थायी समितीवर शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. 

महापालिकेच्या सभागृहात भाजपचे 66 नगरसेवक आहेत. त्या खालोखाल शिवसेनेचे 35, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाच, तर तीन अपक्ष व एक रिपाइं असे पक्षीय बलाबल आहे. याचा विचार केल्यास भाजपचे नऊ सदस्य स्थायी समितीवर नियुक्त होणार असल्याने 16 सदस्यांच्या सभागृहात भाजपला सत्ता मिळविणे सहज शक्‍य आहे. परंतु, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एका सदस्याबरोबर गटनोंदणी केल्याने त्या पक्षांचे प्रत्येकी सात सदस्य होतात; तर मनसेने यापूर्वीच एका अपक्षाला सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने मनसेचे सहा सदस्य झाले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य स्थायी समितीत पोचेल. शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केली आहे. त्यामुळे आता रिपाइंच्या एका सदस्याबरोबर युतीची नोंदणी करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. नोंदणी झाल्यास स्थायी समितीत शिवसेनेचे पाच सदस्य नियुक्त होतील. त्यामुळे भाजपच्या सदस्यांची संख्या एकने घटून आठपर्यंत येईल. सभापतिपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे भाजपला सहजासहजी सत्ता मिळू न देण्याचे शिवसेनेसह दोन्ही कॉंग्रेस व मनसेचे प्रयत्न आहेत. भाजप व शिवसेनेसह अन्य पक्षांचे प्रत्येकी आठ-आठ सदस्य झाल्यास चिठ्ठी पद्धतीतून सभापतिपदाची नियुक्ती होईल. 

Web Title: nashik municipal corporation standing committee issue