महापालिका निवडणुकीसाठी राज, उद्धव ठाकरे मैदानात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांचा शहरात राबता राहणार आहे. प्रचारासाठी शहरातील सर्वांत मोठ्या गोल्फ क्‍लब मैदानावर कुणाची जंगी सभा होईल, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. या मैदानासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्या पक्षांकडूनच मैदानाचे बुकिंग झाले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात 16 फेब्रुवारीला उद्धव यांच्या सभेची निश्‍चिती झाली आहे. मनसेकडून 17 किंवा 18 फेब्रुवारीची मागणी नोंदविण्यात आली; परंतु मैदान सर्वांना उपलब्ध व्हावे म्हणून एक तारीख निश्‍चित करण्याची सूचना महापालिकेकडून करण्यात आली. 

नाशिकमध्ये गोल्फ क्‍लब व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान राजकीय पक्षांच्या जंगी सभांसाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा याच मैदानावर झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सभा, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा येथे झालेल्या आहेत. राजकीय वातावरण बदलून टाकणाऱ्या सभा येथेच होत असल्याने या मैदानावर कुठल्या पक्षाच्या सभा होतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. शिवसेना व मनसेकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी पहिले बुकिंग शिवसेनेकडूनच झाले आहे. 16 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांची मोठी प्रचारसभा होईल. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होईल. मनसेकडून 17 व 18 फेब्रुवारीचे बुकिंग मागितले आहे. पण सर्वांना मैदान उपलब्ध व्हावे म्हणून एक तारीख निश्‍चित करण्यास सांगण्यात आले. मुंबई येथील तारीख निश्‍चित झाल्यानंतर नाशिकला सभा होणार असल्याचे मनसेच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.

उत्तर महाराष्ट्र

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे...

06.06 PM

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड...

10.03 AM

पिलखोड (ता. चाळीसगाव) : काकळणे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात निंदणीचे काम चालू असताना महिला मजुरांमधील जिजाबाई नाईक यांच्यावर...

09.24 AM