अवघ्या दीड हजार क्विंटल शेतमालाची आवक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - शेतकऱ्यांच्या संपानंतर शेतमाल वाहतुकीतील घट कायमच आहे. शेतकरी संपाबाबत होणाऱ्या निर्णयाकडे तमाम बळिराजाचे लक्ष असल्याने आजही शेतमालाची बाजारात आवक झाली नाही. दिवसभरात जिल्ह्यात विविध बाजारपेठांत अवघ्या एक हजार 465 क्विंटल शेतमालाची आवक झाली.

शेतमालाचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू केले आहे. शेतमाल विक्रीसाठी पोलिस बंदोबस्त देण्याबरोबर बाजार समितीची सेवा सुरू केली आहे. मात्र, शेतकरी मालच आणत नसल्याने शेतमाल टंचाईचा प्रश्‍न गंभीर होत आहे.