साठ हजार पोलिसांची वैद्यकीय तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नाशिक - राज्यातील पोलिस दलात कार्यरत असलेल्या ४५ वर्षांवरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा अध्यादेश सरकारने जारी केला आहे. त्यानुसार राज्यभरातील ४५ वर्षांवरील सुमारे ६० हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वैद्यकीय तपासणीचा लाभ होईल. येत्या जुलै ते सप्टेंबरदरम्यान हे आरोग्य तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. 

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक व्याधी जडत आहेत. त्यांचे वेळीच निदान होत नसल्याने अचानक उद्‌भवणाऱ्या आजारामुळे पोलिस अधिकारी वा कर्मचारी हृदयरोग, मधुमेह, जादा वजन आदींचे शिकार बनत चालले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच वैद्यकीय तपासणीचा आदेश जारी केला. मात्र, यातून भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. पोलिस दलात ४५ वर्षांवरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६० हजार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तपासणी १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान करण्याचे आदेश देत त्याची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पोलिस महासंचालकांना दिाल्या आहेत.