जल्लोषाच्या वातावरणात आदिवासी गौरव दिन

जल्लोषाच्या वातावरणात आदिवासी गौरव दिन

इगतपुरी - देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखविणारे दिशादर्शक आहेत. स्वातंत्र्य चळवळींसह स्वराज्यासाठी बलिदान करून देशासमोर न फेडता येणारे ऋण करून ठेवले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आदिवासी रानकवी तुकाराम धांडे यांनी केले.

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त इगतपुरी येथे विविध कार्यक्रम झाले. या वेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ते म्हणाले, की संस्कृतीचे रक्षक आदिवासी बांधव अजूनही उपेक्षित असले तरी येणारा काळ आदिवासींचा सर्वांगीण उत्कर्ष करणारा ठरेल. यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, हिंदू महादेव कोळी संघटना यांच्यातर्फे विशाल मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तालुक्‍यातून आलेल्या आदिवासी बांधवांच्या चिंचलेखैरे, कथ्रूनगण, तळेगाव, शेंगाळवाडी ते इगतपुरी शहरातील तीनलकडी पुलापर्यंतच्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर इगतपुरीच्या राजकमल सभागृहात भव्य मेळावा झाला. 

आदिवासी बांधवांसाठी माजी सैनिक रमेश वारघडे, सुरेश भांगरे यांनी भोजनव्यवस्था केली. राजू थवील यांनी दहावी, बारावीच्या गुणवंतांना मोफत पुस्तकांचे वितरण केले. या वेळी राष्ट्रीय सुवर्णपदक ज्यूडो विजेते प्रवीण साबळे, राष्ट्रीय योगासने स्पर्धा विजेते अभिजित सारुक्ते, रग्बी राष्ट्रीय खेळाडू साधना भांगरे, एसएससीमध्ये ९७ टक्के गुण मिळविणारी विद्यार्थिनी संस्कृती कडाळे यांना नाशिक महापालिकेच्या आदिवासी शिक्षकांनी आदिवासी रत्न पुरस्कार, करंडकाचे वितरण रानकवी तुकाराम धांडे यांच्या केले. यांसह दहावी, बारावी गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना गुणगौरव करून मान्यवरांनी सन्मानित केले.

या वेळी आदिवासी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मोतीराम पवार, महादेव कोळी संघटनेचे इगतपुरी शहराध्यक्ष सुरेश भांगरे, सरचिटणीस विकास शेंगाळ, संपर्कप्रमुख संजय वारघडे, आदिवासी विकास आघाडीचे नितीन उंबरे, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम भवारी, नगरसेविका संगीता वारघडे, अनिल गभाले, नामदेव लोहरे, कैलास जाखेरे, चिंचलखैरेचे उपसरपंच निवृत्ती खोडके, मंगाजी खडके, इगतपुरी पतसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम सारुक्ते, हरिश्‍चंद्र भोये, हिरामण चव्हाण, शिरीष पाडवी, मधुकर आवारी, भाजयुमो प्रदेश नेते महेश श्रीश्रीमाळ, गणपत वारघडे, गणेश धोंगडे, सागर हांडोरे, दत्ता साबळे, भाऊसिंग जाधव, रामदास तळपे, पोपट घाणे, रोहिदास कोकणी, नामदेव बागूल, धर्मेंद्र बागूल, मधुकर रोंगटे, प्रकाश तळपे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंकुश तळपे, आदिवासी शिक्षक संघटनेचे प्रदेश नेते निवृत्ती तळपाडे यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन करवंदे यांनी आभार मानले.

जि.प. खेड गटात उत्साह
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध ठिकाणी अनेक उपक्रम उत्साहात झाले. सकाळी नऊच्या सुमारास आंबेवाडी येथून निघालेल्या मोटारसायकल रॅलीत जवळपास सहाशे आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. ही रॅली वासाळी, इंदोरे, खडकेद, बारशिंगवे, सोनोशी, शिरेवाडी, मायदरा, अडसरे, खेडमार्गे सर्वतीर्थ टाकेदला आली. ग्रामपंचायत सदस्य विक्रमराजे भांगे, हरिदास लोहकरे तसेच जगन्नाथ डगळे, सतीश बांबळे, दत्ता पेढेकर, नवनाथ लहांगे, यशवंत पारधी, महेंद्र नांगरे, भगवान भोईर, बाबू रोंगटे, निवृत्ती नवाळे, जगन सारुक्ते, वसंत बांगर, तुषार लहामटे, संदीप धादवड, राधाकृष्ण धादवड, ललित मडके, योगेश लहामटे, शुभम भांगरे यांनी रॅलीसाठी परिश्रम घेतले.

टाकेदच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येही जागतिक आदिवासी दिन साजरा झाला. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परदेशी व चंद्रकांत डामसे यांनी  क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख, सरपंच बाळासाहेब घोरपडे, ज्ञानेश्‍वर धादवड, नीलेश बांबळे, नंदू जाधव, यशवंत धादवड आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच टाकेद येथील आदिवासी महर्षी आश्रमशाळा व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील आदिवासी क्रांतिवीरांच्या वेशभूषांत प्रभातफेरी काढली.

वाघेरा आश्रमशाळा, त्र्यंबकेश्‍वर
महाराष्ट्र समाजसेवा संघ, नाशिक संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेत जागतिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी पेठ पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश टोपले यांची प्रमुख उपस्थिती होती, तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप चौधरी अध्यक्षस्थानी होते. या वेळी श्री. टोपले यांनी मनोगतातून आदिवासींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगितले, मुख्याध्यापक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नितीन पवार यांनी आदिवासी संस्कृती व बोलीभाषांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. श्रीमती तायडे यांनी सूत्रसंचालन केले. आत्माराम कोरडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पिंप्री आश्रमशाळा, त्र्यंबकेश्‍वर
त्र्यंबकेश्‍वरच्या पिंप्री आश्रमशाळेत जागतिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा झाला. या वेळी पिंप्रीचे सरपंच दत्ता पारधी यांची अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे व्यवस्थापक अविनाश जोशी प्रमुख पाहुणे होते.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून प्रभातफेरी काढली. कार्यक्रमातही विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच पारंपरिक आदिवासी नृत्यांनी त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे पूर्ण संयोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. या वेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. श्री. महाले यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बोरसे, श्री. सानप व श्रीमती देवरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com