भोंदूबाबांविरुद्ध आखाड्याचा ‘शड्डू’

भोंदूबाबांविरुद्ध आखाड्याचा ‘शड्डू’

आसाराम, स्वामी असीमानंद, राधे माँ, राम रहीमसह १४ जणांचा यादीत समावेश 

नाशिक - अखिल भारतीय आखाडा परिषदेने आज देशातील १४ बाबा भोंदू असल्याचे जाहीर केले. अलाहाबाद येथे आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी चौदा नावे जाहीर केली. तसेच येत्या मंगळवारी (ता. १२) आखाडा परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे.

अलाहाबादला दुपारी आखाडा परिषदेच्या १३ आखाड्यांची नरेंद्रगिरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन १४ भोंदू बाबांची नावे जाहीर करीत आखाडा परिषदेने संबधित बाबा भोंदू असून, ते समाजात दिशाभूल करीत असल्याचे निवेदन काढले त्यात, आसारामबापू ऊर्फ आशुमल शिरमलानी व त्याचा पुत्र नारायणसाई, सुखबिंदर कौर ऊर्फ राधेमाँ, सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता, गुरमीत राम रहीम सिंह, ओमबाबा ऊर्फ विवेकानंद झा, निर्मलबाबा ऊर्फ निर्मलजितसिंह, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा, रामपाल, आचार्य कुशमुनी वृहस्पती गिरी, मलखान सिंह अशा १४ बाबांची नावे जाहीर केली आहेत.

संत पदवीबाबत चर्चा
बैठकीत संत पदवीविषयी चर्चा झाली. अखिल भारतीय अखाडा परिषदेतर्फे ‘संत’ ही पदवी देण्याची प्रक्रिया निश्‍चित केली जाणार आहे. आखाडा परिषदेने वेळोवेळी विविध कुंभमेळ्यांमध्ये अशा भोंदूना विरोध केला. यापुढे भोंदूकडून होणारी संत- महंतांची व तमाम साधू समाजाची बदनामी टाळण्यासाठी संत पदवी प्रदानाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच तत्पूर्वी येत्या मंगळवारी (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आखाडा परिषदेचे पदाधिकारी भेटणार आहेत. त्यात कुंभमेळा तयारीसह बाबा विषयांवर चर्चा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com