...अन्‌ भारद्वाजाने घेतली आकाशी झेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नाशिक - भल्या पहाटे आकाशातून भला मोठा पक्षी अचानक जमिनीवर पडला... आयतेच सावज मिळाल्याने भटक्‍या कुत्र्यांनी एकच धाव घेतली... पण, त्याचवेळी सायकलीवरून फिरायला निघालेल्या तिघांनी या पक्ष्याला कवेत घेतले. त्याच्यावर उपचार केले आणि जेव्हा त्याने आकाशात झेप घेतली तेव्हा त्यास जीवदान देणाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

इंदिरानगर- गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकने सायकलिस्ट अशोक जगताप, गौरव राजपूत ५ सप्टेंबरला सायकलवरून पहाटे फेरफटका मारत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर काही अंतरावर अचानक मोठा काळ्या रंगाचा पक्षी जमिनीवर पडला. अचानक पडलेला पक्षी पाहून काही भटक्‍या कुत्र्यांनी आयतेच भक्ष्य मिळाल्याच्या आनंदात धाव घेतली. परंतु वेळीच प्रसंगावधान राखत जगताप यांनी पक्ष्याला उचलले. भेदरलेल्या स्थितीतील पक्ष्याला घरी आणले आणि पक्षीमित्र जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे नेले. तेव्हा हा पक्षी कावळा नसून भारद्वाज असल्याचे जगताप यांना समजले.

योग्य उपचारानंतर ठिकठाक 
जयेश पाटील यांनी भारद्वाजला तपासले असता त्याचा एक पाय फॅक्‍चर झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याच्या पायाला प्लास्टर केले. चार-पाच दिवसांत भारद्वाजचा पाय ठीक झाला. त्यानंतर भारद्वाज आकाशात मुक्त संचार करण्यासाठी योग्यतेचा वाटल्यानंतर अशोक जगताप व जयेश पाटील यांनी त्यास पांढुर्लीच्या जंगलात नेऊन सोडले असता, भारद्वाजनेही आनंदाने मुक्त झेप घेतली. मात्र त्याचवेळी अशोक जगताप यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. यापूर्वीही जगताप यांनी जखमी कबुतरांना जीवदान दिले आहे.

टॅग्स