सुधारित अंदाजपत्रक चौदाशे कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक - महापालिका प्रशासनाकडून पुढील वर्षाचे आर्थिक ठोकताळे जुळविण्याची तयारी सुरू असतानाच प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यास सुरवात केली आहे. लेखा विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुधारित अंदाजपत्रक चौदाशे कोटींपर्यंत स्थिरावरणार असल्याने स्थायी समिती व महासभेने वाढविलेल्या अंदाजपत्रकाचा फुगा फुटणार आहे.

महापालिका निवडणूक झाल्यानंतर आयुक्तांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले होते. २०१७- १८ या आर्थिक वर्षासाठी १४१० कोटी सात लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. स्थायी समितीकडून विविध कामांचा समावेश करत एक हजार ७९९ कोटी ३० लाखांपर्यंत अंदाजपत्रक महासभेला सादर करण्यात आले. महासभेकडूनही त्यात वाढ सुचविण्यात आली. दोन हजार १७६ कोटी ४१ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्ष संपत असताना उत्पन्न व खर्चाच्या बाजूचा विचार करता दर वर्षीप्रमाणे आयुक्तांचेच अंदाजत्रक खरे ठरले. प्रशासनाचे अंदाजपत्रक चौदाशे कोटींपर्यंतच मर्यादित राहणार आहे.

जानेवारीअखेर नवे अंदाजपत्रक
प्रशासनाकडून फेब्रुवारीअखेर अंदाजपत्रक सादर केले जाते; परंतु यंदा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी जानेवारीत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार यंदा प्रथमच जानेवारीअखेर प्रशासनाकडून अंदाजपत्रक ठेवले जाणार आहे. ३१ मार्चपूर्वी स्थायी समितीकडून अंतिम मान्यता मिळणार आहे.

Web Title: nashik news budget nashik municipal corporation