नोकरीच्या आमिषाने पावणेसहा लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

जुने नाशिक - नासर्डी (ता. अमळनेर) येथील पाटील कुटुंबातील सदस्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांवर भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

भद्रकाली परिसरातील सुदर्शन शिंदे, ललीत संजय खैरनार व चेतन संजय खैरनार (दोघे सख्खे भाऊ) यांनी नासर्डी येथील मधुकर पाटील यांची मुलगी व भाच्यास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैशांची मागणी केली.

नोकरीच्या आमिषापोटी पाटील यांनी वेळोवेळी संशयित सुदर्शन शिंदेच्या बॅंक खात्यात पावणेसहा लाखांच्या रकमेचा भरणा केला. सहा महिने उलटूनही नोकरी मिळाली नाही. त्यांनी संशयितांशी संपर्क साधला. संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी भद्रकाली पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी सुदर्शन, ललीत व संजय या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.