'नव्या पिढीला मैदानापर्यंत आणण्याचे आव्हान'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक - शहराप्रमाणे ग्रामीण भागात विविध खेळांमध्ये चांगले खेळाडू दडले आहेत. मात्र, संगणक, मोबाईलच्या जमान्यात युवकांचा मैदानांपासून दुरावा वाढला आहे. या गोष्टीकडे सामाजिक व्यस्थेच्या दृष्टीने पाहायला हवे. नव्या पिढीला मैदानापर्यंत आणण्याचे क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍ती, संघटनांपुढे आव्हान आहे, असे मत विभागीय आयुक्‍त महेश झगडे यांनी  येथे व्यक्त केले. 

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्‍लब) जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे (कै.) किशोर सूर्यवंशी स्मृती करंडक आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष विनोश शहा, सचिव समीर रकटे, राजेंद्र सूर्यवंशी, असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी गजाभाऊ आहेर, विलास लोणारी आदी उपस्थित होते. 

श्री. झगडे म्हणाले, की प्रशासनातर्फे राबविलेल्या "चला खेळूया' उपक्रमात क्रिकेटचाही समावेश होऊ शकतो. नाशिकसारख्या शहरात स्टेडियम असणे, ही काळाची गरज आहे. सामूहिक प्रयत्नातून ही बाब शक्‍य होऊ शकेल. 

राजेंद्र सूर्यवंशी यांनी (कै.) किशोर सूर्यवंशी यांचे खेळाबद्दलचा प्रेमभाव, योगदान यावर प्रकाशझोत टाकला. प्रास्ताविकात श्री. शहा म्हणाले, की ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही खूप क्षमता आहेत. मात्र, ग्रामीण भागापर्यंत पायाभूत सुविधा व संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्पर्धेत योगदान देणाऱ्या तालुका स्तरावरील विविध व्यक्‍तींचा या वेळी सत्कार झाला.