बांधकाम परवानग्यांना आयुक्त राजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना

नाशिक - नव्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर दहा टक्के अतिरिक्त, तर नऊ मीटर रुंदीवरील रस्त्यांवर अधिक अतिरिक्त एफएसआय दिला आहे. 

अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना

नाशिक - नव्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर दहा टक्के अतिरिक्त, तर नऊ मीटर रुंदीवरील रस्त्यांवर अधिक अतिरिक्त एफएसआय दिला आहे. 

त्याअनुषंगाने नगररचना विभागात प्रस्ताव दाखल होत असले, तरी मंजुरीबाबत लेखी आदेश नसल्याने अभियंत्यांकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नव्हती. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज स्पष्ट लेखी आदेश काढून मंजुरीचे धोरण ठरविले आहे. नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बंद अवस्थेत असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.

नगररचना विभागाच्या सुट्या रद्द
नव्या व जुन्या नियमांचा मेळ घालून रखडलेल्या परवानग्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगररचना विभागाच्या वैयक्तिक व साप्ताहिक सुट्या रद्द केल्या आहेत. सकाळी नऊ ते बारादरम्यान साइट व्हिजिट, सायंकाळी पावणेसहा ते रात्री दहापर्यंत बांधकामाच्या परवानग्या देण्याच्या सूचना आहेत.

काय आहेत आयुक्तांच्या सूचना...
नव्या नियमावलीतील अतिरिक्त दहा टक्के एफएसआयच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावावी
तीन मीटर फ्रंट मार्जिन सोडणे बंधनकारक
तीन मीटरपेक्षा अधिक प्रोजेक्‍शन असेल, तर आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव
तीन मीटर मार्जिनमध्ये बाल्कनी क्षेत्राचे उल्लंघन होत असल्यास हार्डशिप प्रीमियम आकारावा
जुन्या इमारतींमधील स्टॅंडिंग बाल्कनीला आर्किटेक्‍चर प्रोजेक्‍शन म्हणून मंजुरी द्यावी
मॅन्युअरिंग मार्जिन सोडून इमारतीची पार्किंग मान्य करावी
मॅन्युअरिंग मार्जिनव्यतिरिक्त उर्वरित जागेवर मेकॅनिकल पार्किंग
नव्या नियमाप्रमाणे जिना नसला, तरी अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेऊन परवानगी द्यावी
सुधारित बांधकाम परवानगीसह भोगवटा दाखला एकत्रितरीत्या मंजूर करावा