वाढत्या रोगराईविरोधात काँग्रेसकडून घंटानाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नाशिक - शहरात डेंगी व स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने त्याविरोधात आज महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. जुने नाशिक भागात एका मुलीचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे व आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शेख हनिफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. अतिरिक्त आयुक्तांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिकमध्ये स्वाइन फ्लू व डेंगी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेताहेत. सर्वाधिक रुग्ण जुने नाशिक भागातील आहे. 

लोकसंख्येची अधिक घनता असल्याने येथे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता बळावल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जुने नाशिक भागात घाणीचे साम्राज्य वाढल्याने डासांची घनता वाढली आहे. त्यामुळेच कथडा भागातील आयेशा साजिद शेख या बालिकेचा बळी गेल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. मृत्यूच्या घटनेनंतरही आरोग्य विभागाकडून औषधफवारणी झाली नाही. पेस्ट कंट्रोलचे काम समाधानकारक होत नसल्याने डास निर्मूलन पूर्णपणे होत नाही. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात अधिकारी अपयशी ठरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली. या वेळी वसंत ठाकूर, बुऱ्हान शेख, रुबिना शेख, शेख इब्राहिम, फारुख कुरैशी, सय्यद बशीर, आसिफ खान, नजीर खान, गुलामअली मणियार, नासीर खान, नदीम शेख, रशीद शेख, रुबिना खान, दुर्रैशा खान, इसाक शेख आदी उपस्थित होते.