वीजबिल, वीजबंदची माहिती "एसएमएस'वर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नाशिक - वीजविषयक माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस'ने पाठविण्याची सुविधा महावितरणने आता मराठीतही सुरू केली असून, नाशिक परिमंडलातील पावणेबारा लाख ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविले असून, मोबाइल ऍपचाही वापर वाढला आहे.

नाशिक परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंपधारक व इतर असे 23 लाख 67 हजार 200 वीजग्राहक आहेत. त्यापैकी 11 लाख 61 हजार 150 ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती "एसएमएस'द्वारे पाठविण्यात येत आहे.

तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी "एसएमएस'ने कळविण्यात येतो. महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या "कर्मचारी मित्र' या ऍपद्वारे वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीजपुरवठा बंदचा कालावधी "एसएमएस'ने नियमित कळविला जातो.