इंदिरानगर परिसरात स्फोटके सापडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

नाशिक - इंदिरानगर परिसरातील पाथर्डी गाव-मुंढेगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाला जिलेटिन व डिटोनेटरने भरलेली बॅग सापडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाथर्डी गाव-मुंढेगाव रस्त्यावर बेवारस बॅग सापडली.

या बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये 60 जिलेटिनच्या कांड्या व 17 डिटोनेटर आढळून आले. प्रथमदर्शनी परिसरात विहीर खोदण्याचे काम सुरू असण्याची शक्‍यता असून, त्यासाठी सदरची स्फोटके असावीत, असा पोलिसांचा कयास आहे.

टॅग्स