नाशिकमध्ये वाहने पेटवली अन्‌ पोलिसांकडून गोळीबार

नाशिकमध्ये वाहने पेटवली अन्‌ पोलिसांकडून गोळीबार

नाशिक : येवला टोलनाक्‍यावर वाहनातील भाजीपाला रस्त्यावर ओतला. मांस वाहतूक करणारा टेम्पो पेटवण्यात आला. कोपरगाव-येवला रस्त्यावर शेतकऱ्यांच्या आडून तरुणांनी शेतमाल लुटला. पिंपळगाव जलाल टोकनाक्‍यावर तणाव तयार झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचे फोडले नळकांडे आणि प्लास्टिक गोळ्यांचे फायरिंग. यामध्ये शेतकरी जखमी झाले आहेत.

  • नैताळे (ता. निफाड) येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ट्रक-टेम्पो अडवून कांदा, डाळिंब, आंबे रस्त्यावर ओतले. पोलिसांकडून लाठीमार. जमावाकडून पोलिस वाहनांवर दगडफेक. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यासाठी रास्ता-रोको आंदोलन
  • बाजार समित्यांसह दूध संकलन केंद्रांवरील व्यवहार ठप्प. लासलगाव बाजार समितीला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे. मुंबईला जाणारा फळे-भाजीपाला थांबला. नाशिक बाजार समितीच्या पुढील भागात भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शेतमाल तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतला. एकाच दिवसात भाजीपाल्याचे भाव दुप्पटीने कडाडले
  • भरवस फाटा (ता. निफाड) येथे टॅंकरमधील सोडले दिले. आंदोलनकांना पांगवताना पोलिस गाडीवर दगडफेक. 8 शेतकऱ्यांसह 18 मोटारसायकली पोलिसांनी घेतल्या ताब्यात.
  • मऱ्हळ (ता. सिन्नर), औंदाणे (ता. मालेगाव), वडाळीभोई (ता. चांदवड) येथे 25 हजार लिटर आणि येवला, नगरसूल, सायगाव येथे शेतकऱ्यांनी ओतले दूध. टाकळी-विंचूर येथे 500 लिटरभर दूधाच्या पिशव्या फेकल्या. दिंडोरीमध्ये दूधाच्या गाड्या अडवल्या.
  • शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सायगाव (ता. येवला) येथे दहन. तसेच शेतकऱ्यांच्या संपाला विरोध केल्याबद्दल माजीमंत्री-वनाधिपती आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांच्याही पुतळ्याचे चिंचखेड (ता. दिंडोरी) येथे दहन. "विनायकदादा विकावू दादा', अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या
  • वडाळीभोई (ता. चांदवड), अंदरसूल (ता. येवला) येथील आठवडा बाजार आणि दिंडोरीमधील रोजचा बाजार बंद. मनमाडमध्ये इंदूर-पुणे महामार्गावरील मालेगाव चौफुलीसह चांदवडमध्ये रास्ता-रोको. थेरगाव, बोकडदरे (ता. निफाड) येथे रस्त्यावर कांदा फेकला. नाशिक-सापुतरा, नाशिक-बलसाड, पिंपळगाव-सापुतरा मार्गावरील दूध-फळे वाहतूक अडवली. दौंडत (ता. इगतपुरी) येथे भाकड जनावरांना शेतमाल खायला घालत शेतकऱ्यांचा निषेध. ओझर येथे रस्त्यावर टरबूज फेकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com