नवीन कचराकुंड्या निर्माण होण्याची भीती

कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झालेल्या स्टॅन्डपोस्ट कचराकुंडीच्या जागा.
कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झालेल्या स्टॅन्डपोस्ट कचराकुंडीच्या जागा.

नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यावसायिक भागांमध्ये स्टॅन्डपोस्ट कचराकुंड्या लावल्या जात आहेत. कचराकुंडीच्या किमतीवरून सध्या वाद सुरू असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. कचराकुंडी भरल्यानंतर महापालिकेकडे तत्काळ कचरा उचलण्याची यंत्रणा नसल्याने कुंडीतून कचरा ओसंडून तर वाहीलच शिवाय त्याच जागेवर पुन्हा कचरा फेकून नवीन कुंड्या निर्माण होण्याची भीती नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे. 

शहरात घंटागाडी योजना अमलात आणताना कचराकुंडीमुक्त शहराचा ठराव महासभेत १९९६ मध्ये मंजूर केला होता. त्यानंतर शहरात नवीन कचराकुंडी झाली नाही. महापालिकेने लावलेल्या स्टॅन्डपोस्ट कुंड्यांच्या बाबतीतही नमनालाच वाद अनुभवास येत आहे. पंचवटी विभागात व्यावसायिक ठिकाणी महापालिकेने कुंडी लावली. कुंडीच्या बाहेर कचरा फेकला जात असल्याने शहरात नवीन कचराकुंडी तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत १८९ ठिकाणी कुंडी लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानात बावीस गुण दिले जाणार आहे. कुंड्या लावताना त्यात गैरव्यहार झाला आहे. साधारण दोन ते अडीच हजार रुपयांना
असलेली कचराकुंडी महापालिकेने अकरा हजार १२१ रुपयांना खरेदी केल्याने वाद निर्माण झाला. शिवसेनेने तर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com